साहित्य व राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू.-अरुणभाई गुजराथी.राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साहात समारोप.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
राजकीय पक्षांचे पदाधिकारी साहित्यिक असल्यामुळे साहित्य आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.औदुंबर साहित्य रसिक मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील,प्राचार्य अनिल लोहार,अनुराग वाजपेयी,डॉ.के.अ.बोहरी,किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,उद्योजक पंकज काबरे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी तोंडातून निघालेला शब्द,बंदुकीतून निघालेली गोळी आणि धनुष्यातून निघालेला बाण परत येत नसल्यामुळे सर्वांनी बोलताना शब्द जपून वापरण्याचे आवाहन केले.शब्दांमुळे मित्र जोडले जात असल्याचे सांगितले.शासनाने कितीही अनुदान दिले तरी शेतकरी जगू शकणार नाही तर साहित्यिक,समाज आणि वैज्ञानिकांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.साहित्य समजून घेणाराही साहित्यिक असल्याचे सांगितले.साहित्य असल्याशिवाय जिवन पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे साहित्यातून प्रमाची निर्मिती झाली पाहिजे असे सांगितले.साहित्याच्या माध्यमातून वैद्न्यानिक निष्ठा निर्माण करून समाजाला दिशा द्यावी असे सांगितले.whatsap मुळे वाचन संस्कृती लोप पावली असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.जीवनाची दिशा बदलण्याची ताकद साहित्यिकांमध्ये असल्याचे सांगितले.घरातील संवाद संपल्यास संसार संपत असतो.वारकरी संप्रदायाने माणसे जोडण्याचे काम केले असल्याचे सांगितले.

आमदार चिमणराव पाटील यांनी माणसाला घडवण्यात साहित्याची मोठी भूमिका असल्याचे सांगितले.समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे याचा विचार साहित्यिकांनी करावा असे आवाहन केले.शेतकरी असलेल्या मुलांना विवाहासाठी मालत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.शेतीला सुरळीत वीज पुरवठा मिळाल्यास तसेच सिंचनाची सोय असल्यास शेतकरी शासनाकडे कर्जमाफीची मागणी करणार नाही असा विश्वास व्यक्त केला.सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.यावेळी प्राचार्य अनिल लोहार,डॉ.नरेंद्र ठाकूर,अनुराग वाजपेयी.डॉ.पी.जी.पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,प्रशांत तिवारी,डॉ.फरहाज बोहरी,डॉ.मनोज देशपांडे,सुनील भंगाळे,सुभाष पाटील,विक्की खोकरे यांचेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.पद्मश्री भंवरलाल जैन लिखित “ती आणि मी” या पुस्तकाबद्दल ज्ञानेश्वर शेंडे यांनी माहिती दिली.औदुमाबर साहित्य रसिक मांचे अध्यक्ष advt.मोहन शुक्ला यांनी संमेलन यशस्वी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास मुख्याधिकारी विकास नवाळे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,आनद दाभाडे यांचेसह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संमेलनासाठी मंचचे अध्यक्ष advt.मोहन शुक्ला,उपाध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,कार्याध्यक्ष प्रविण महाजन,जाकीर सय्यद,संदीप ठाकूर,भीमराव सोनावणे,पी,जी.चौधरी,निंबा बडगुजर,उद्योजक विजय जाधव,भीमराव सोनावणे,माधुरी कुलकर्णी यांचेसह सभासदांनी सहकार्य केले.समारोपप्रसंगी हास्य कलावंत बंडा जोशी यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टीम झुंजार