अमरावती :- चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या पीएसआय किवटेंसह तिघांना निलंबित करण्यात आले, तर ठाणेदार गीरमे यांना कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले.पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा आदेश काढले. कठोरा मार्गावरील शिवरसिक नगर येथील सातपुते यांच्याकडे 9 जून रोजी चोरी केल्याच्या आरोपात गाडगे नगर पोलिसांनी तितली चंद्रभान थापा (30, रा. अमरावती) नामक महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
परंतु चौकशीदरम्यान तितली थापा यांना पोलिस कर्मचा:यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना विद्युत शॉक दिल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी चंद्रभान थापा यांनी पोलीस आयुक्त व आ.यशोमती ठाकुर यांना तक्रार केली होती. प्रकरण मानवाधिकार आयोगात गेल्यानंतर आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक, अमरावती पोलीस आयुक्त आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्यात आली होती. या तिन्ही अधिका:यांना 25 जून रोजी राज्य मानवाधिकार आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान शुक्रवारी (21 जून) रोजी पोलीस आयुक्तांनी आदेश काढून पीएसआय किवटें व दोन शिपाई असे तिघांना निलंबित केले. तर ठाणेदार गिरमे यांची नियंत्रण कक्षाला बदली केली. याप्रकरणाची पुढील तपास राजापेठ एसीपींकडे देण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्याचे झाले निलंबन
पीएसआय मोहन केवटे, शिपाई महेश शर्मा, मिना मुंडाले यांना निलंबत करण्यात आले. तर ठाणेदार हनुमंत गिरमे यांना कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






