त्या इसमाच्या मृत्यूला जबादार कोण त्यासाठी सर्वांना शॉकोज नोटीस देणार — डॉ. सुरेश पाटील..
चोपडा l प्रतिनिधी (डॉ.सतीश भदाणे):–
आज दिनांक 1 जुलै रोजी दुपारी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंश झालेल्या इसम डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे इसम दगावला अखेर उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड होणारा प्रकाराबाबत गावात जोरात चर्चा सुरू आहे.
चोपडा येथील मोठा माळी वाड्यातील पुंडलिक गोबाळू महाजन वय 60 वर्ष हा इसम गिरीष गुजराथी यांच्या शेतात रोजदारी कामाला गेलेल्या होता दुपारचे जेवण झाल्यावर 10 मिनिटे विश्रांती घेऊ या बेताने झोपडीत बसलेल्या असताना
अचानक सापाने हाताचा अंगुठाला चावा घेतला आणि हाताचा मनगटाला वेढा घेतल्याने महाजन यांनी भरपूर आरोळ्या मारल्या परंतु जवळ कोणीही नव्हते बाजूच्या शेतातील एक इसम आला तो पर्यंत साप पसार झाला होता तेव्हा अजून दोन ते तीन लोक आल्याने महाजन यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 2 वाजता आणले असता ड्यूटीवर कोणताहि डॉक्टर हजर नव्हते त्यामुळे नातेवाईकानी संताप व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा मात्र डॉ.धनंजय आढरे तब्बल 45 मिनीटांनी हजर झाले आणि त्यांनी प्राथमिक उपचार केला परंतु डॉ.धनंजय आढरे यांची ड्युटी दुपारी 2 वाजता संपते त्या अगोदरच ते जेवणाला बसले होते असं त्यांनी स्वतः कबूल केले.
आणि दुपारी 2 पासून डॉ. तृप्ती पाटील यांची ड्युटी होती मात्र त्या देखिल दुपारी 3 वाजेला त्या आल्या. आणि तो पर्यंत डॉ.आढरे निघून गेले होते. तो पर्यंत सर्पदंश झालेले पुंडलिक महाजन यांची प्राणज्योत मावळली. म्हणून डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळेच मेले त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत त्यांनी मृतदेह आम्ही घरी घेऊन जाणार नाही असा पवित्र घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे इन्चार्ज डॉक्टर सुरेश पाटील यांनी व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी मध्यस्थी करून त्या गोष्टीला विराम केला
नातेवाईकांनी लेखी लेखी मध्ये आम्हाला द्या की यापुढे अशी घटना होणार नाही यावेळी डॉक्टर सुरेश पाटील यांनी उद्या सकाळी मी तुम्हाला लेटर पॅड वर लिहून देतो की यापुढे कोणतीही अशी घटना घडणार नाही याची काही मी स्वतः घेतो असं लेखी तुम्हाला देतो व संबंधित डॉक्टर जबाबदार असतील तर त्यांना सर्वांना शोकाज नोटीस बजावली जाईल व या तसा अहवाल जिल्हा अधीक्षकांकडे पाठवला जाईल असे ठणकावून सांगितले
तदनंतर नातेवाईकांनी एक पाऊल मागे सरकत विषयाला विराम दिला परंतु हा असा प्रकार वारंवार उपजिल्हा रुग्णालय येथे का होतो असा सवाल सामान्य नागरिकाला पडलेला आहे कोणताही डॉक्टर वेळेवर येत नसल्याचे येथे लोकांनी बोलून दाखविले व आठ तास ड्युटी असून सुद्धा कोणीही आठ तास बसायला तयार नाही दोन दिवसापासून विविध वृत्तपत्रांना उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात बातम्या सुरू असून देखील निर्लज्जपणाच्या कळस गाठलेला दिसतो व लोकांच्या जीवाशी हे खेळत असतात की काय ? असेही लोकांनी बोलून दाखवले डॉक्टर सुरेश पाटील यांना इन्चार्ज असल्यामुळे ह्या सर्वबाबी ऐकावे लागल्या.
संतप्त लोकांनी डॉक्टर सुरेश पाटील यांना सल्ला दिला की समोर एक डिस्प्ले लावा त्यावेळी कोणत्या डॉक्टरांचे ड्युटी आहे व संबंधित डॉक्टरांच्या मोबाईल नंबर सुद्धा द्या अन्यथा हे डॉक्टर इथं हजर राहत नाही सामान्य जनतेला मोबाईल नंबर मिळाल्यास डॉक्टर कुठे आहे हे विचारायला सोईस्कर होईल आणि लोकांच्या धाकामुळे डॉक्टरही जागेवर बसतील असा सल्ला समतप्त नागरिकांनी दिला.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.