जळगाव :- शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे.याप्रकरणी रविवार रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २७ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे.
दरम्यान महिला आंघोळ करत असताना संशयित आरोपी सचिन किशोर भाट रा. नंदुरबार, बंटी दीपक नेतले रा. दोंडाईचा आणि निलेश युवराज तमाईचे रा. नंदुरबार या तिघांनी फोटो व व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर महिलेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 डिसेंबर 2022 ते 6 जून 2024 च्या दरम्यान वेळोवेळी नैसर्गिक आणि नैसर्गिकरित्या तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान हा प्रकार तिला सहन न झाल्याने थेट एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवार २३ जून रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी सचिन किशोर भाट रा. नंदुरबार, बंटी दीपक नेतले रा. दोंडाईचा आणि निलेश युवराज तमाईचे रा. नंदुरबार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा