पाचोरा :- आर्वी गावी एका बारा वर्षे विद्यार्थीनिस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला असल्याची घटना समोर आली असून पाचोरा पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस अटक करण्यात आली आहे.या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे दिनांक ४ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बारा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत झोपलेली असताना
आरोपी विनोद कुमार बच्छाव सिंग पटेल ( वय – ३७) (राहणार सेक्टर-६ टकहीया पहाडी वार्ड-१५ परसोई ओझर, सोनभद्र उत्तर प्रदेश) याने तिचे तोंड दाबून खांद्यावर उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मुलीच्या हातात आईच्या साडीचा पदर असल्याने साडी ओढला गेला व तिच्या आईला जाग आली व आईने आरडा -ओरड करताच आरोपीने मुलीला सोडून तेथून पळ काढला सदरील आरोपीचा मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही
सदर घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर)पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले व पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले या घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.