एरंडोल- पळासदड (ता.एरंडोल) येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात झालेल्या लोखंडी पाईप व angal चोरी प्रकरणातील पाच
संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.चारही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले
असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश यांनी दिला.दरम्यान अटकेतील संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शकयता आहे.संशयितांकडून चोरी केलेले लोखंडी पाईप जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी की,पळासदड येथील शास्त्री फार्मसी कॉलेजमधून १५ जून रोजी अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुअप्ये किमतीच्या लोखंडी पाइअप्चि चोरी केली होती.शहरासह ग्रामीण भागात शेतातील पाईप, इलेक्ट्रिक मोटारी,शेतीचे अवजारे यासह अन्य वस्तूंच्या चो-यांमध्ये वाढ झाली होती.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना चोरोच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नंदलाल पाटील व भगवान पाटील हे गस्त घालत असतांना त्यांना शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये किशोर मोहन माळी याने लोखंडी पाईपची चोरी केली असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी उपनिरीक्षक राहुल तायडे,गणेश वाघमारे हवालदार नंदलाल पाटील,भगवान पाटील,किरण चौधरी,राहुल बैसाणे,हेमंत पाटील,सचिन महाजन,ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले.एरंडोलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास देशमुख,हवालदार अनिल पाटील,मुकेश आमोदकर,अकिल मुजावर,मिलिंद कुमावत,अनंत पाटील,योगेश जाधव यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित किशोर माळी रा.माळीवाडा,एरंडोल याचेबाबत माहिती काढून त्यास ‘उपसरपंच चहा’ दुकानाजावळून ताब्यात घेतले.
पथकातील सदस्यांनी त्याची चौकशी केली असता
त्याने शास्त्री कॉलेजमध्ये पाईपची चोरी केल्याची कबुली दिली.सदर चोरी मध्ये तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी व एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असून तिघांनी कॉलेज मधून ५७ लोखंडी पाईप चोरी केल्याचे सांगितले. कॉलेजमधील चोरी करण्यात आलेले पाईप राज भगवान गायकवाड रा.जुना धरणगाव रस्ता एरंडोल व समीर उर्फ सनी आनंदा संदानशिव यांचा ताब्यात दिले असल्याची माहिती दिली.स्थानिक पथकाने किशोर मोहन माळी, तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी,राज भगवान गायकवाड, समीर उर्फ सनी आनंदा संदानशिव यांना ताब्यात घेवून विचारपूस केली.
त्यामध्ये किशोर माळी,तोताराम माळी व एका अल्पवयीन बालकाने राज गायकवाड व सनी संदानशिव यांच्या सांगण्यावरून ५७ पैपांची चोरी करून ते दीपक उर्फ गोलू नामदेव पाटील यांच्या मालकीच्या tractor वाहून नेल्याचे सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांकडून ४१ हजार २०० रुपये किमतीचे ४७ लोखंडी पाईप व गुन्ह्यात वापरलेले सोनालिका कंपनीचे
tractor जप्त केले आहे.अटक केलेल्या चारही संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
आहे.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास
देशमुख तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.