Viral Video: सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आश्चर्यचकित करतात तर काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो.त्यामुळे त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. परंतु काही जणांच्या मनाविरोधात देखील लग्न केले जाते. त्यामुळे अशावेळी काहीतरी विचित्र घडल्याचे तुम्ही याआधी पाहिले असेलच. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लहान मुलांसारखी रडताना दिसतेय वधू
लग्न समारंभ संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक वधू आणि वर विविध गोष्टी करतात. तर काही वधू-वर त्यांच्या विचित्र कृतीने व्हायरल होतात. नुकताच लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. यात नववधू निरोपाच्या वेळी जोरजोरात रडताना दिसत आहे. सासरी जाण्याच्या विचाराने ती लहान मुलांसारखी रडताना दिसत आहे. तिचा आक्रोश ऐकून तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेले दिसत आहेत. दरम्यान वधू सासरी जाण्यास राजी नसतानाही तिला जबरस्ती उचलून गाडीत बसवण्यात आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
नातेवाईकांनी तिला उचलून गाडीत बसवले
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लग्नानंतर निरोपाच्या वेळचा असल्याचे दिसत आहे. वधूला समजले की आता ती आपल्या आई-वडिलांचे घर सोडून सासरच्या घरी जाणार आहे. प्रत्येक वधूप्रमाणे तीही निराश झाली आणि जोरजोरात रडू लागली. ती वरासोबत जायला तयार नव्हती. अखेर नातेवाईकांनी तिला उचलून गाडीत बसवले. वधूच्या रडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. तिची पाठवणी पाहण्यासाठी जवळपास संपूर्ण गाव जमा झाले. नववधूचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
काही सेकंदाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
लग्नाशी संबंधित शेकडो व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच, पण यात जे प्रकार पाहायला मिळतय ते तुम्ही यापूर्वी असे क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडिओ @PalsSkit नावाच्या X हँडलवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना यूजरने लिहिले की “नवरीने असा माहोल तयार केला की पाठवणी कमी आणि अपहरण जास्त वाटत आहे”. काही सेकंदांचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.
व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया
एका यूजरने लिहिले की, अशी पाठवणी कोण करतं, खरंच पाठवणी कमी आणि अपहरण जास्त वाटतंय. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, हद्द झाली. एकाने लिहिले की, नाही भाऊ, गावाकडे खरंच असं होतं. आणखी एका यूजरने लिहिले की, हुंड्याशिवाय पाठवणी करताय असं वाटतंय. तर एकाने लिहिले की तिला सरकारी नोकरीवाला नाही मिळाला वाटतं. अशा अनेक मजेशीर कमेन्ट या व्हिडिओवर येत आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.