दील्ली पोलिसांचा हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा; ‘बिग बॉस’चा विजेत्यासह ‘या’ अभिनेत्याची मुलगी ताब्यात

Spread the love

.

नवी दिल्ली : हैदराबादमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४२ जणांना ताब्यात घेतले आहे. या पार्टीत काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्याच व्यक्तींचाही समावेश आहे. बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता नागा बाबू यांची कन्या निहारिका कोनिडेला, बिग बॉस तेलुगू रिऍलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. निहारिका कोनिडेला ही मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आहे. पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोकेन आणि चरस जप्त केले असल्याचीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

गायक आणि बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचाली ताब्यात घेण्यात आले आहे. राहुलने 12 फेब्रुवारी रोजी हैदराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू केली तेव्हा त्याने थीम सॉंग गायले होते. त्याशिवाय, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगू देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे.

टीम झुंजार