पारोळा: – ६ जुलै रोजी मतदारसंघातील शेतकऱ्यांना पिक विमा व पी.एम.किसान योजनेबाबत होत असलेल्या भटकंती व गैरसोयीची दखल घेत
आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी गंभीरे, नायब तहसीलदार एस.के. पाटील, पिक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी, पिक विमा एरंडोल तालुका प्रतिनिधी चेतन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
यावेळी पिक विमा धारक ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारारी नोंदविलेल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, तसेच येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांचा बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची इतरत्र भटकंती अथवा गैरसोय होता कामा नये यासाठी खबरदारी घेण्यात यावे.
तसेच पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होतांना दिसत आहे, सर्व आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर सुद्धा या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, त्यासाठी शेतकरी तहसिल कार्यालय, सी.एस.सी सेंटर येथे फेऱ्या माराव्या लागतात, यासाठी तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना याबाबत होत असलेली गैरसोय कशी दुर होईल यासाठी नियोजन करण्याचा सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील उपस्थित होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.