झाशी (उत्तर प्रदेश) :- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ब्युटी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर प्रियकराने बंदुक काढून वधू बनलेल्या प्रेयसीच्या छातीत गोळी झाडली.वधूला तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. खरं तर, हे प्रकरण झाशीच्या सिपरी बाजार पोलीस स्टेशन परिसरातील आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलीस स्टेशन हद्दीतील वरगायन गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हत्येतील आरोपीचा प्रियकर दीपक अहिरवार याचे काजल नावाच्या तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते.
यावेळी प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचे जाणवले. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. दरम्यान, काजलचे लग्न झाशीतील तिच्या कुटुंबीयांनी निश्चित केले होते. रविवारी 23 जून रोजी काजलचे लग्न होणार होते. काजल ही नववधू बनण्यासाठी सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटीआयजवळील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. काजलचे लग्न झाशीत निश्चित झाले होते, याची माहिती तिचा प्रियकर दीपकला मिळाली. प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करून झाशीला गेला. काजलचे लग्न झाशी सिमथ्री येथे राहणाऱ्या राजसोबत निश्चित झाले होते.
काजलच्या लग्नाचे आयोजन झाशीच्या सिपरी बाजार येथील एका मॅरेज हॉलमध्ये करण्यात आले होते. दरम्यान, काजल जवळच्या ब्युटी पार्लरमध्ये तिचा मेकअप करण्यासाठी गेली. त्यानंतर काजलचा प्रियकर दीपक याने मागून येऊन जबरदस्तीने पार्लरची काच फोडली आणि काजलला सोबत चालण्यास म्हंटले. काजलने नकार दिल्याने प्रियकराने पिस्तुलाने नवरीच्या छातीत गोळी झाडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या दीपकने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. त्याने पार्लरमध्ये बसलेल्या त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारलं. यानंतर तो बंदूक घेऊन पळून गेला. एसएसपी राजेश एस यांनी म्हटलं, की मुलीवर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली आहे. आता ज्या घरातून वरात काढायची होती तिथे नवरीवरच अंत्यसंस्कार होणार आहेत.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.