निमद्या वन्यजिव वनहद्दीत शेकडो साग वृक्षाची बेकायदेशीर कत्तल प्रकरणी एकास तीन.दिवसाची वन कोठडी

Spread the love


पाल. ता रावेर वार्ताहर :- दि.07/07/2024 रोजी यावल वन्यजीव अभयारण्यातील पाल वन्यजीव वनपरिक्षेत्र निमड्या पासून तीन किमी अंतरावरील वन्य जीव वनहद्दित कक्ष क्र. 52 मधिल राखीव वनक्षेत्रात अवैध शंभरच्या वर साग वृक्षतोड करून पुरावे नश्ट करण्याचे प्रयत्न सबंधित अतिक्रमणं धरकडून करण्याचे प्रयत्न होते या प्रकरणी वनरक्षक निमड्या यांच्याकडील प्र.गु.रि.02/2024 दि.26/06/2024 मधिल आरोपी सलदार जलदार तडवी रा. निमड्या यास अटक करुन म. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रावेर यांच्या न्यायालयात हजर केले. मे. न्यायालय यांनी आरोपी यास 03 दिवसाची वनकोठडी तपासकामी सुनावण्यात आली.

सदरची कार्यवाही श्री. गजेंद्र हिरे उपवनसंरक्षक वन्यजीव नाशिक, श्री. सत्यजित निकत सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव यावल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव पाल, श्रीमती रजनी घोडके वनपाल मोहमांडली, श्री. प्रविण पाटील वनपाल गारबडी, श्री.संभाजी सूर्यवंशी, वनपाल पाल, श्री. जगदिश बारेला वनरक्षक निमड्या, श्री. संजय बारेला वनरक्षक मोंढ्याचार-1, श्री. रोहिदास पाटील वनरक्षक मोंढ्याचार-2, श्री. राजमल बारेला वनरक्षक तपासणी नाका हॅकडझिरा, कु. सकिना तडवी वनरक्षक गारबडर्डी-2, श्री. राजु तडवी वनरक्षक गारबर्डी-1, वनसंरक्षक मजुर पाल वन्यजीव वनपरिक्षेत्र यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सदर वनगुन्ह्याचा पुढील तपास सुरु

टीम झुंजार