एरंडोल :- शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष
प्रा.मनोज पाटील यांनी दिली.नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे रहिवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ‘झुंजार न्यूज’ने अनेकवेळा वाचा फोडली होती.
शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमध्ये गटार व नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामे सुरु असल्यामुळे सर्वत्र रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल व गारा निर्माण झाल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली होती.पालिका प्रशासनाने देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.रस्त्यांवरील चिखलामुळे वाहन चालक घसरून पडून वाहनांचे देखील नुकसान होत होते.
रहिवाशांनी प्रा.मनोज पाटील यांची भेट घेवून चिखलामुळे होणा-या त्रासाची माहिती दिली होती.तसेच वसाहतींमध्ये प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याची विनंती केली होती.युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील व पदाधिका-यांनी हनुमाननगर,आदर्श नगर,ओमनगर, लक्ष्मीनगर, आनंदनगर,साईनगर,इंद्रप्रस्थ कॉलनी, अष्टविनायक कॉलनी,गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मीनगर,म्हसावद रस्त्यावरील रामदास कॉलनी यासह सर्व नवीन वसाहतींमधील रहिवाशांच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या होत्या.
यावेळी रहिवाशांनी समस्यांचे निवेदन देवून रस्त्यांसह अन्य कामे करण्याची मागणी केली होती.नवीन वसाहतींमधील रस्त्यांसह सर्व समस्या सोडविण्याचे तसेच रहिवाशांना पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रा.मनोज पाटील यांनी नागरिकांना दिले होते.प्रा.मनोज पाटील यांनी पदाधिका-यांसह आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेवून नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणा-या त्रासाची माहिती देवून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाच्या हद्दवाढ आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे प्रा.मनोज पाटील यांनी सांगितले.आमदार चिमणराव पाटील यांनी रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडे
पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्दल प्रा.मनोज पाटील यांनी त्यांचे आभार मानले.नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून कामांना लवकर सुरुवात करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.