शिक्षणाचा दर्जा सांभाळला तर पुढच्या काही पिढ्या योग्य रस्त्याने गेल्याशिवाय राहणार नाहीत- खा.शरद पवार

Spread the love

झुंजार प्रतिनिधी-संतोष कदम
लाखेवाडी: (ता. इंदापूर)
लाखेवाडीला ज्यांनी या संस्थेची स्थापना केली ते श्रीमंत ढोले सर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी जय भवानी गड विकास प्रतिष्ठान स्थापुन एक उत्तम दर्जेदार शिक्षणाच संकुलउभं केलं. या संकुलामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील मुलं, मुली आहेत. आणि त्यांना ज्या पद्धतीचे शिक्षण देण्याची गरज आहे त्याची काळजी याठिकाणी घेतली. आज इंग्रजी मिडीयम त्यांच्याबद्दलचा वाद असतो, काही लोक म्हणतात मातृभाषेचा अभिमान ठेवा, इंग्रजी कशासाठी, मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे, मातृभाषा ही आपल्या सगळ्यांना पुढे न्यायला मदत करते. आणि म्हणून मातृभाषेची शिक्षण संस्था ही असली पाहिजे.

पण जगाच्या ज्ञानाची भाषा कोणती असेल तर ती इंग्रजी मध्ये. आज जगामध्ये कुठेही गेले तर इंग्रजीमध्ये त्याठिकाणी सुसंवाद ठेवावा लागतो. त्या इंग्रजीशी आपण सुसंवाद ठेवला तर तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणं तितकं अवघड जात नाही. आज या ठिकाणी जे संकुल उभ केलं त्याच्यामध्ये श्रीमंत ढोलेंनी ज्या अनेक संस्था उभ्या केल्यात त्याच्यामध्ये फार्मसीच कॉलेज आहे. दुसरे कॉलेज आहे, सीबीएससी आहे, बाकीचे अनेक आहेत या सगळ्यांमध्ये दर्जा हा महत्त्वाची गोष्ट आहे. तो दर्जा सांभाळला तर माझी खात्री आहे या सगळ्याच्या वर पुढच्या काही पिढ्या या योग्य रस्त्याने गेल्याशिवाय राहणार नाहीत. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाचे उद्घघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , दीपक जाधव यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे सचिव हर्षवर्धन खाडे, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, फसवेगिरी चे राजकारण करणाऱ्यांना जनतेने थारा देऊ नये. मागच्या एका निवडणुकीमध्ये गणपतराव बापू ज्या वेळेस उभे होते त्यावेळेस सूतगिरणी काढायची अशी एक भूल उठवली. याद्या तयार केल्या कुठल्या गावातील किती मुले घ्यायची, मुलांना ही बरे वाटलं एक संस्था होते आहे. निवडून गेल्यानंतर सूतगिरणीचा कुठे पत्ता नाही. कापूस कुठं, सुत कुठं, गिरणी कुठं काहीच पत्ता नाही. तर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना लाखेवाडी ला बायो शुगर काढण्यासाठी कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या. मात्र आज देखील या जमिनीवर कुसाळे दिसतात. असा घणाघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांनी केला.

टीम झुंजार