VIDEO: तरुणीच्या या डान्सचे 22 कोटी व्ह्यूज, 1 लाख 8 हजार कमेंट्स, 27 लाख वेळा झाला शेअर तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड;पहा व्हिडिओ

Spread the love

Video : प्रत्येकामध्ये काही तरी खास असतं. ज्यामुळे ते लोक ओळखले जातात. अनेकांमध्ये छुपे गुण असतात जे त्यांनी कधी कळत नाही. पण जेव्हा ते लोकांसमोर येतात तेव्हा ही लोक त्यांच्या या गुणांमुळे प्रसिद्ध होतात.असं म्हणतात ज्या लोकांना शरीरासंबंधात काही समस्या असेल तर त्यात नक्की काही तरी खास असा गुण असतो. जो त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. या सोशल मीडियाच्या जगात अनेक व्हिडीओ आपल्याला असे पाहिला मिळतात ज्यामध्ये काही तरी वेगळं आपल्याला पाहिला मिळतं.

अशातूनच सोशल मीडियाच्या दुनियेत ही लोक रातोरात व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. तिच्या डान्सिंग स्टाईलने नेटकऱ्यांना वेड लावलंय. डान्सिंग व्हिडीओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत 22 कोटींहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. (viral video 22 crore views 1 lakh 8 thousand comments shared 27 lakh girl dance Trending now )

कोण आहे ही तरुणी?

ग्रेसी बोन असं या महिलेचं नाव असून ती पनामा सिटीची राहते. या व्हिडीओमध्ये ग्रेसीला साल्सा करताना पाहिला मिळेल. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ग्रेसी बोनने तिच्या डान्सिंग पार्टनरचा हात हात घेऊन डान्स करताना दिसत आहे. साल्सा हा डान्स अनेकांना जमत नाही. या डॉन्ससाठी शरीर लवचिक असलायला हवं. या व्हिडीओमध्ये काही खास नसलं तरी ग्रेसीच्या चेहऱ्यावरचं हास्य जबरदस्त आहे. ग्रेसीचं हसणे पाहून तुम्हाला तिची ऊर्जा नक्कीच जाणवले.

आतापर्यंत त्याच्या व्हिडीओंला 22 कोटी 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर या व्हिडीओ 27 लाखांहून अधिक वेळा शेअर करण्यात आला असून 1 लाख 8 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. ग्रेसी लठ्ठपणामुळे या व्हिडीओवर बहुतांश लोकांनी अश्लिल कमेंट केल्या आहेत.खरंतर, ग्रेसी बोनच्या लठ्ठपणाचेंकारण एक दुर्मिळ आजार असून त्याला लिपेडेमा असं म्हटलं जातं. ग्रेसी बोन ही व्यवसायाने प्लस साइज मॉडेल आहे.

मात्र या आजारामुळे तिच्या कमरेच्या वरचा भाग पातळ झाला असला तरी कमरेच्या खालचा भाग जाड झालाय. या आजारात मांड्यांभोवती भरपूर चरबी जमा होते. त्यामुळे कंबरेखालील भाग जाड दिसायला लागतो. मात्र, अनेकदा लोक त्यांना त्यांच्या लठ्ठपणामुळे ट्रोल करतात. इतकंच नाही तर काही लोक आरोप करतात की ग्रेसीला प्लास्टिक सर्जरीद्वारे असे शरीर मिळवलंय. तर काही लोक तिच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवतात. पण ग्रेसीने प्लास्टिक सर्जरीच्या आरोप नाकारला आहे. कोणाच्याही शरीर आणि रंगावरुन कमेंट करणे आणि त्यांची खिल्ली उडवणे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे.

https://www.instagram.com/reel/C538PxcvPLR/?igsh=MWRsbDh0ZmdpMmE1Zw==

हे पण वाचा

टीम झुंजार