मुंबई :- देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस विभागातच महिला असुरक्षित असेल तर? हो तुम्ही बरोबर वाचलत. मुंबईत कुंपणानेच शेत खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या विवाहित महिलेवर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसाने शारिरीक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या 32 वर्षीय पोलिसाने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवलं. प्रेमसबंध जुळवून नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रूमवर नेऊन तब्बल 2 वर्ष शारीरिक संबंध जुळवून तिच्याकडून खोटे सांगून 19 लाख रुपये उकळले. आरोपी पोलिसाने तिला नवरा सोडून देण्यास सांगितले. तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. फसवणूक घेतलेल्या पैशापैकी 14 लाख 61 हजार परत केले. मात्र, अनेकवेळा त्याने तिला खोटे बोलून आणि जिवे मारण्याची धमकी आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे सानपाडा येथील रूमवर शारीरिक शोषण केले.
सदर प्रकरणी झिरो एफआयआर दाखल झाल्याने ती सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. सानपाडा पोलिसांनी संबधित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेवरून पोलीस ठाण्यातच एका महिला पोलिसांसोबत असे कृत्य होत असेल तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे न्यायाची अपेक्षा करायची? कायद्याचे रक्षकच असे भक्षक बनले तर राज्यात सामान्य माणूस सुरक्षित कसा राहिल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४
- धुळे येथे ५०० महिला जय श्रीराम घोषणा देत एकाच वेळी आल्या मतदान केंद्रावर: महिलांची मते निर्णायक
- एरंडोल येथे आईच्या मृतदेह घरात, मुलाने केले मतदान: राष्ट्रीय कर्तव्य बजावून समाजाला दिला आदर्श.
- एक्झिट पोल २०२४: महाराष्ट्रातील ७ एक्झिट पोलमध्ये महायुती तर दोघांच्या सर्वेक्षणांमध्ये मते महाविकास आघाडीला बहुमत
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.१९ नोहेंबर २०२४