वरातीचे नेतृत्त्व त्याच्याच पहिल्या पत्नीने म्हणजे अनिता देवीने केले. तर त्याचे दुसरे लग्न हे चौपारण येथील नरेना गावातील सुमन देवीसोबत होत होते.
हजारीबाग : गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. तसेच विवाहबाह्य संबंधांच्याही अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.हजारीबाग येथील बरही परिसरातील अनुमंडल प्रांगणातील शिव मंदिरात एका पत्नीने आपल्या पत्नीचे दुसरे लग्न लावून दिले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
बरही येथील शिव मंदिरात बुधवारी जिल्ह्यातील केंदुआ 3 येथील रहिवासी असलेल्या दामोदर पासवान दुसरे लग्न करण्यासाठी आला होता. लग्नात वरातीचे नेतृत्त्व त्याच्याच पहिल्या पत्नीने म्हणजे अनिता देवीने केले. तर त्याचे दुसरे लग्न हे चौपारण येथील नरेना गावातील सुमन देवीसोबत होत होते. सुमन देवीच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. पहिल्या पतीपासून सुमनला दोन मुलेही आहेत. ही मुले आता त्यांच्या आजोबा आणि आजीसोबत राहणार आहेत.तर दुसरीकडे दामोदर पासवानची पहिली पत्नी अनीता देवीने सांगितले की, लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली.
मात्र, एकही मुलगा झाला नाही. या कारणामुळे वंश पुढे चालावा म्हणून तिने आपल्या पत्नीचे दुसरे लग्न एका विधवा महिलेसोबत लावून दिले. कारण यामुळे त्यांना मुलगा होईल आणि त्यांचा वंश पुढे चालेल. या लग्नामुळे कुटुंबातील सर्व लोक आनंदी आहेत. आता आम्ही दोन्ही पत्नी अगदी बहिणीसारखं एकाच घरात राहू, असेही तिने सांगितले.तर दामोदर पासवान याने सांगितले की, त्यांच्या पहिल्या लग्नाला आता 15 वर्षे झाली आहेत. मात्र, एकही मुलगा झाला नाही.
यामुळे समाजातील अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. पत्नी आणि सासरच्या लोकांनी एक मुलगी शोधली. त्या मुलीसोबत मी लग्न करत आहेत. पुढे मी भविष्यात दोन्ही पत्नींना सारखे प्रेम करेन. दोन्ही सोबत बहिणींसारखे एकाच घरात राहतील. घरातील वाद आम्ही घरातच सोडवू, असेही त्याने सांगितले. दरम्यान, या नवीन लग्नामुळे नववधूही आनंदी आहे.
हे पण वाचा
- Viral Video: भररस्त्याच्या धावत्या बाईकवरच पत्नीने नवऱ्याला गाडीवरच चप्पलने धू धू धुतलं, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- प्रेम आंधळं असतं ! ग्रॅज्युएट झालेल्या तरुणीने 8 वी नापास झालेल्या युवकांशी केलं लग्न, काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा….
- धक्कादायक! सप्तशृंगगडाच्या शितकड्यावरून उडी घेत तरुण-तरुणीने संपविले जीवन.मृत्यूचे कारण अस्पष्ट.
- एरंडोलला चाललंय तरी काय ? सबकुछ गुपचूप गुपचूप- चर्चातेरी भी चूप मेरी भी चूप-
- Viral Video:रस्त्यावरुन जाणाऱ्या बुरखाधारी महिलेला जबरदस्ती जवळ ओढलं अन् केला ‘किस’ युवकास पोलिसांकडून चोप पहा व्हिडिओ.