गावठी कट्टयाने फायरींग करून दहशत माजवणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केले जेरबंद,

Spread the love

जळगाव :- मा.डॉ.श्री महेश्वर रेडी, पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक इसम हे दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्नी शस्त्र वापरत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून अश्यां लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले. दिनांक २७/०७/२०२४ रोजी पोह हरिलाल पाटील यांना गुप्त बातमीदारा कडून एक इसम हा हातात पिस्टल घेवून निर्जनस्थळी गावठी कट्टयाने फायरींग करीत असतांनाचा व्हीडीओ व्हाट्सअॅप वर प्राप्त झाला होतो.

सदर इसम हा अज्ञात होता त्याचा शोध होणेकामी मा.श्री.बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी श्रेपोउनि अनिल जाधव, सफौ अतुल वंजारी, पोह हरिलाल पाटील, विष्णु बिन्हाडे, हेमंत पाटील, प्रदिप सपकाळे, भारत पाटील, प्रदिप चवरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते. नमुद पथकाने फायरींग करणारे अज्ञात इसमाचा शोध घेतला असता विशाल राजेंद्र ठाकुर, रा.इंदिरा नगर अडावद असे असल्याचे निष्पन्न करून सदरची फायरींग करून उनपदेव कडे जाणाऱ्या शेतामध्ये केल्याची सांगीतले होते.

सदरचा गावठी कट्टा हा रोहन रविंद्र पाटील, रा.लोणी ता. चोपडा ह.मु. कोनगाव भिंवडी जि.ठाणे याचे सोबत खरेदी केल्याचे सांगीतले होते. सदरचा गावठी कट्टा रोहन पाटील कडे असल्याचे सांगुन तो कोनगाव येथे गेला असले बाबत सांगीतल्याने सदरचे पथक हे लागलीच कोनगाव येथे जावून रोहन पाटील यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता सदरचा गावठी कट्टा हा लोणी ता. चोपडा येथे लपवून ठेवला आहे असे सांगीतले.

त्यावरून सदर पथक हे लोणी ता. चोपडा येथे जावून आरोपी रोहन रविंद्र पाटील याने सांगीतल्या प्रमाणे ३००००/- रु. किंमतीचा गावठी कट्टा व २०००/- रु. किं.चे ४ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून त्याचे विरुध्द अडावद पो.स्टे. ला CCTNS NO १२४/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री संतोष चव्हाण नेम. अडावद पो.स्टे. हे करीत आहेत. सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार