दिल्ली :- येथे एक मोठा अपघात घडला असून, ओल्ड राजेंद्रनगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात 12 फूट पाणी साचल्याने यात बुडून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.दरम्यान कोचिंग सेंटरमध्ये इतके पाणी कसे भरले, याबाबतचे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तळघरात बांधलेल्या लायब्ररीत सुमारे 30-35 विद्यार्थी उपस्थित होते. काल सायंकाळी 7 वाजता लायब्ररी बंद झाल्यानंतर बाहेर पडतानाच समोरून अतिशय दाबाने पाणी येत होते. आम्ही लायब्ररी रिकामी केली तोपर्यंत ती गुडघाभर पाण्यात होती.
आत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, आम्हाला पायऱ्या चढता येत नव्हत्या. 2-3 मिनिटांत संपूर्ण तळघर 10-12 फूट पाण्याने भरले. तिथून बाहेर पडण्यासाठी दोर टाकण्यात आले, पण पाणी इतके घाण होते की काहीच दिसत नव्हते. तेथून एक एक करून मुलांना बाहेर काढले जात होते. माझ्या मागे आणखी दोन मुली होत्या असे विद्यार्थिनीने सांगितले. ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत. गेटमधून पाण्याचा प्रचंड दाब येत होता, आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तीव्र दबावामुळे आम्ही पायऱ्या चढू शकलो नाही. पाणी एवढ्या वेगाने भरत होते की 2 ते 3 मिनिटांत संपूर्ण छतापर्यंतचे तळघर पाण्याने भरले होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात काल सायंकाळी 7 वाजता झाला. यापूर्वीही इथे पाणी साचले होते, आठवडाभरापूर्वी ते पाण्याने भरले होते त्यामुळे आम्हाला वरच्या बाजूलाच थांबवण्यात आले.
पाणी तुंबण्याची परिस्थिती अशी आहे की अनेक वेळा आमचे क्लास रद्द केले जातात, ते 2 ते 2.5 तास पाण्याने भरलेले असते. मागच्या वेळी जेव्हा आम्ही क्लासला आलो होतो तेव्हा सकाळी दहाच्या सुमारास आम्हाला तळघरात जाण्याची परवानगी दिली नव्हती, कारण अनेक विद्यार्थ्यांच्या गाड्या पाण्यात तरंगत होत्या.
दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी या अपघाताबाबत सांगितले की, नाला किंवा गटार फुटल्यामुळे तळघरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणाल्या की, एमसीडी अधिकाऱ्याची चूक निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल.
४ पंपाने पाणी भरलं
बेसमेंटमध्ये एवढं पाणी भरले होते ज्यामुळे लायब्रेरीतील फर्निचर पाण्यावर तरंगत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे आले. मुसळधार पावसामुळे आधीच रस्त्यावर पाणी भरलं होतं. बेसमेंटमधील पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर पंपचा वापर करण्यात आला. ४ मोटरपंपच्या सहाय्याने पाणी बाहेर काढले.
हे पण वाचा
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.