लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती नोकरी निमित्त मुंबईत राहात होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे गावी आल्यानंतर समजल्यावर त्याने पत्नीला झाडाला बांधून तालिबानी शिक्षा दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावात ही घटना घडली आहे. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवऱ्याने पत्नीला झाडाला बांधलं, तिच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर तिचे केस कापले आणि चपलेचा हारही घातला.
नवऱ्याने पत्नीसोबत हे सर्व पंचायतीच्या आदेशावरून केले आहे. पंचायतीच्या तालिबानी शिक्षेचे प्रकरण समोर आले आहे. पंचायतीच्या या आदेशामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.गावातील युवक लवकुशसोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे पत्नीला तालिबानी शिक्षा दिल्याचा आरोप पतीने केला आहे. महिलेचे त्याच गावात राहणारा लवकुश नावाच्या युवकावर प्रेम होते. विवाहित महिलेला तीन मुले आहेत. मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे. महिलेचा पती हरिलाल हा मुंबईत खासगी नोकरीला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. पती मुंबईहून परतल्यावर त्याने महिला आणि तिच्या प्रियकराला बोलताना पकडले होते.
त्यानंतर गावची पंचायत झाली. या प्रेमीयुगुलाला तालिबानी शिक्षा देण्यात आली होती. पण, प्रियकराने पंचायतीच्या तावडीतून निसटून पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिस येणाऱ्यापूर्वीच महिलेचं तोंड काळं करून तिचे केस कापण्यात आले होते.पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती हरिलालसह 15 जणांना अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय रॉय यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. गावात तणावाचे वातावरण पाहता पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.