पारोळा :- तालुक्यातील मोंढाळे प्र.अ. येथील स्व.योगेश विश्वास देवरे हे पंचायत समिती, पारोळा अंतर्गत मोंढाळे प्र.अ. ग्रामपंचायतीत कर्तव्यात होते. ते कर्तव्यात असतांना कोव्हीड-१९ संसर्गामुळे त्यांचा दि.१३ एप्रिल, २०२१ रोजी मृत्यू झाला. त्यांचे असे अचानक निघुन जाण्याने त्यांचा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशात स्व.देवरे यांच्या वारसांनी विमा कवच रक्कम मिळणेसाठी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली होती. त्याची आमदार चिमणराव पाटील यांनी दखल घेत तातडीने स्व.देवरे यांना विमा कवच रक्कम मिळणेसाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयाला प्रस्ताव तयार करून शासन दरबारी दाखल करण्याचा सुचना केल्या होत्या.
तद्नंतर या प्रस्तावाचा आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा केल्याने स्व.देवरे यांच्या वारसांना ५० लक्ष रूपये विमा कवच रक्कम मंजुर झाली. या मंजुरीचा आदेश आज आमदार चिमणराव पाटील, शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते स्व.देवरे यांचे वारस पत्नी श्रीमती.सुरेखा योगेश देवरे यांना सुपुर्द करण्यात आला.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम