डुग्गीपार :- मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून मारहाण केली, एवढेच नव्हेतर विनयभंगही केला. घडलेल्या प्रकाराची तक्रार करण्यास गेली असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही. उलट आपल्यावरच गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी भूमेश्वरी चोळाये या आदिवासी महिलेने कोहमारा येथे 21 रोजी आयोजित पत्रपरिषदेत केली. भुमेश्वरी यांच्या मालकीची हलबीटोला येथे शेती आहे. शेतीवर 2018 पासून फिरोज सय्यद व त्यांची पत्नी असिफा फिरोज सय्यद यांनी झोपडी बनवून अतिक्रमण केले आहे. याची तक्रर डुग्गीपार पोलिस, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना करूनही दखल घेली नाही.
आपल्यावरच खोटे आरोप करून गुन्हे दाखल केलेत. 6 जून रोजी शेतात असताना फिरोज व असिफा यांनी अतिकक्रामीत जागेवर विद्युत अर्थिंग तार रोवले. त्यांना हटकले असता अश्लिल व जातिवादक शिवीगाळ करून फिरोज अंगावर धावून येत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून विनय भंग केला. एवढेच नव्हेतर फिरोज व आसिफाने काठी, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात आपण जखमी झालो. डुग्गीपार पोलिसांना फोन करून बोलावले. त्यांनी पांढरी आरोग्य केंद्रात नेले. येथे उपचार करून करून ठाण्यात आणले.
पोलिसांनी तक्रार न घेता दुपारी 1 पासून रात्री 9.30 वाजतापर्यंत बसवून ठेवले. यानंतर आपल्या मनाने पोलिसांनी तक्रर हूिन त्यावर स्वाक्षरी घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आपल्यावर झालेल्या प्रकारबाबत लेखी तक्रार दिली. ठाणेदार काळे यांनी घरी येऊन माझे म्हणने न ऐकता उलट मलाच धमकावित उद्या ठाण्यात ये तुझी तक्रार लिहून घेतो असे बोलून निघून गेले. दुसर्या ठाण्यात गेली असता ठाणेदारांनी पुन्हा धमकावीत घटनेचे साक्षीदार आण असे सांगितले. तेथून निघून उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तक्रार दिली.
आपले म्हणने न ऐकता पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी भूमेश्वरी चोळाये यांनी पत्रकार परिषदेत केली.दोन्ही पक्षांनी पक्षाकडून तक्रारी प्राप्त घल्या आहेत.
तक्रारीनुसार दोन्ही पक्षावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कुणावरही भेदभवाने गुन्हा नोंद करण्यात आला नाही, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.मंगेश काळे ठाणेदार, पोलिस स्टेशन डुग्गीपार.