पुणे :- पोलीस ठाण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशीसाठी बोलविलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात ‘थर्ड डिग्री’ टॉर्चर देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी एका महिलेला चौकशीसाठी बोलविले होते त्यानंतर त्यांनी तिला अमानुषपणे मारहाण केली. त्यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पिडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे.
यावरुन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सदाशिव दिवेकर (वय-50), महिला पोलीस हवालदार योगिता भानुदास आफळे, निलम सचिन कर्पे, माया तुकाराम गाडेकर आणि एक अनोळखी महिला पोलीस शिपाई, अनोळखी पुरूष पोलीस कर्मचारी, अक्षय जीवन आवटे (वय-31 रा. सोमवार पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे), आदित्य गौतम (वय-30 रा. साततोटी गणेश मंडळ, कसबा पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आवटे हा महिलेचा पती आहे. महिलेने पतीच्या दोन मित्रांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याचा राग मनात धरुन आरोपी पती व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी पोलीस निरीक्षक रमेश साहेबराव साठे यांनी ‘हिला आतमध्ये घ्या’ असे सांगितले. आणि त्यानंतर महिलेला ‘थर्ड डिग्री’ टॉर्चर देण्यात आला.
त्यानंतर महिला पोलीस हवालदार योगिता आफळे, माया गाडेकर, आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यातील एका खोलीत घेऊन गेले. त्याठिकाणी महिलेचे काहीही ऐकून न घेता. पाच जणांनी कंबरेच्या पट्ट्याने, लाथा बुक्क्या व ठोशांनी मारहाण केली. त्यामध्ये महिला जखमी झाली आहे. तसेच त्यांच्यापैकी एकाने अक्षय अवटे, आदित्य गौतम व सुजित पुजारी हे एका राजकीय पुढाऱ्याची माणसे आहेत. ते जीवे ठार मारतील असे म्हणाले. तर सुजीत पुजारी याने याबाबत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.