Viral Video: रीलस्टार होण्यासाठी CSMT च्या बाहेर भरगर्दीत बिनधास्त महिलेचा अश्लील पेहरावात डान्स; नेटकरी करताय ट्रोल पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: जगात कदाचित प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे पैसे. श्रीमंतीच्या बळावर माणूस काय काय करू शकतो याचं उदाहरण दरदिवशी सोशल मीडियावर पाहायला मिळतंच! पण अलीकडे या पैशाच्या मोहाला तोडीस तोड टक्कर देणारी एक गोष्ट अनेकांच्या मनात घर करून बसलीये आणि ती म्हणजे प्रसिद्धी! कुणाला व्हायरल व्हायचंय, कुणाला मिलियन सबस्क्राइबर्स हवे आहेत, कुणाला पेड प्रमोशनसाठी ब्रँड्स दाराशी आलेले हवे आहेत तर कुणाला फक्त लक्ष वेधून घ्यायचं आहे. एकूणच काय तर रीलच्या दुनियेत छाप पाडण्यासाठी अनेकांचा खटाटोप चालू आहे.

गंमत म्हणजे रीलस्टार होण्यासाठी काही जण रिअल आयुष्यात स्वतःचं हसं करून घ्यायला सुद्धा घाबरत नाहीत. अशाच एका बिनधास्त महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी एक महिला बेली डान्स करत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. या महिलेचे नाव आलिया असे असून ती एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या बसस्थानकाच्या जवळच भरगर्दीत या आलियाला नाचून रील बनवायची होती.

आपणही कधी इथे प्रवास केला असेल तर आपल्याला माहीतच असेल की या भागात कामाला जाणाऱ्या मंडळींची प्रचंड गर्दी असते, बससाठी मोठमोठ्या रांगा लावून प्रवासी उभे असतात, अशावेळी लोकांना त्रास देत व्हिडीओ बनवण्याचा हा हट्ट खरंतर मूर्खपणाचा आहे, अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर अनेकांनी नोंदवली आहे.व्हिडिओमध्ये ब्लाउज आणि स्कर्ट घालून ही आलिया सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर बेली डान्स करताना दिसतेय. काही जण या स्टंटबाजीकडे दुर्लक्ष करून धावपळीतच निघून जात आहे तर काहीजण मात्र तिथे उभे राहून आलियाचा नाच बघत आहेत.

सध्याच्या व्हिडीओवर तुफान ट्रोलिंग झाल्यावर कदाचित तिने तो व्हिडीओ आपल्या पेजवरून हटवला असावा पण यापूर्वीचेही तिचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट केलेला हा व्हिडीओ साहजिकच तुफान व्हायरल झाला होता. तिच्या काही चाहत्यांनी यावर कमेंट करताना सार्वजनिक ठिकाणी एवढा कॉन्फिडन्ट डान्स करण्यासाठी हिंमतच लागते असं म्हणत स्तुती केली होती. पण ९० टक्के लोकांनी तिच्या या स्टंटबाजीला मूर्खपणा म्हणत कारवाईची मागणी केली होती. स्टेशन परिसरात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बीएमसीचे कर्मचारी कष्ट करून पोट भरणाऱ्या विक्रेत्यांना सुद्धा उभं राहू देत नाहीत आणि ही अशी ‘अश्लील नौटंकी’ कशी काय खपवून घेतली जाते? असा प्रश्न या व्हिडीओमुळे उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार