Viral Video:एका सेंकदाची किंमत काय आहे हे ‘या’ बोलेरो जीपच्या ड्रायव्हरला विचारा;डोंगरावरुन पडला भला मोठ्ठा दगड अन्……. पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे.कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.’दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यानंतर काही दिवस उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. दर वर्षीच्या पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला मिळतात.

एका सेंकदाची किंमत या ड्रायव्हरला विचारा

भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घाटात अनेक वाहने ये-जा करत आहेत. यावेळी अचानक एक भयानक भूस्खलन होते आणि यामध्ये एक कार सुखरुप पुढे येते तर एका जीपवर मोठा दगड कोसळतो फक्त एका सेंकदाच्या फरकानं ही दुर्घटना घडली आहे.

सुदैवानं यामध्ये जीप ड्रायव्हर थोडक्यात बचावला असून फक्त जीपचे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामधून एका सेंकदाचंही किती महत्त्व आहे हे कळून येत आहे.घटनेनंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेकजण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/reel/C7_VlL4MbVh/?igsh=MTg5MGF0ZXZ1eXJtbQ==

हे पण वाचा

टीम झुंजार