छत्रपती संभाजीनगर :- बऱ्याचदा कौटुंबात लहान-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. अनेकदा या भांडणाचे कारण ही काही क्षुल्लक गोष्टी असतात. मात्र अनेकदा कौटुंबिक वादाचे रुपांतर भयानक घटनेत बदलतानाही आपण पाहिले असेलच. त्यातच पुन्हा एका अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. ज्यात काही कौटुंबि कारणांवरुन थेट महिला आणि पुरुषांमध्ये भररस्स्यात हाणामारी झाली आहे. सध्या यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लीखाना येथे सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
सिल्लीखाना येथे एका कुटुंबात काही कारणांवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. रोजच्या वादातून काही तरी मार्ग निघावा यासाठी हे कुटुंब पोलिस आयुक्तालयाच्या दिलासा सेलमध्ये आले होते. मात्र या ठिकाणी आल्यावरही त्यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरु झाले. मात्र कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादानंतर थेट रस्त्यात हाणामारी झाली आहे. ही हाणामारी थेट कुटुंबातील महिला आणि पुरुषांमध्ये झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सर्व हाणामारी दिसून येत आहे.
गाडी न थांबवल्याचा राग, वाहतूक पोलिसांकडून तरुणाला भरचौकात बेदम मारहाण;
छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना ताजी असताना काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. ज्यात गाडी न थांबवल्याचा राग अनावर झाल्याने एका वाहतुक पोलिसाने तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी तो व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ही झाला होता शिवाय त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होईलका असे अनेक प्रश्न उपस्थिक केले होते. संपूर्ण घटना ही वाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी चौकामध्ये २६ जून रोजी सांयकाळी घडली होती.
भररस्त्यात टोळक्याकडून जोडप्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
छत्रपती संभाजीनगरमधून वारंवार अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील शासकीय विश्रामगृहासमोर काही टवाळखोर टोळक्याने एका जोडप्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर(City) हादरुन गेल होतं शिवाय या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.