जळगाव :- चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच -३० बीडी- ११०३ हे वाहन देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहनात बनावट देशी दारू टँगोपंच १८० मी. ली. क्षमतेच्या एकूण २५४४ बाटल्या (५३ बॉक्स), विदेशी दारू मॅंकडोवेल नं. १ विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण २४० बाटल्या (५ बॉक्स) व विदेशी दारू इम्पेरिअल ब्लू विस्कीच्या १८० मी.ली. क्षमतेच्या एकूण-२४० बाटल्या (५ बॉक्स) अशा प्रकारचा बनावट मद्यसाठा मिळून आला आहे. असा अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किमंत रुपये- ५,७९,४८०/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ.श्री. विजय सूर्यवंशी साहेब, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव, संचालक पी.पी.सुर्वे साहेब (अं व द.), श्रीमती उषा वर्मा मँडम, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, श्री.डॉ.व्ही.टी. भूकन अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०६ऑगस्ट,२०२४ रोजी के. एन. गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने सावखेडा शिवार ता. अमळनेर जि.जळगाव येथे कारवाई केली.
या वाहनासोबत मिळून आलेले इसम शुर्भम सुधाकर पाटील रा. अरूननगर चोपडा ता. चोपडा जि.जळगाव व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर-२ चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.
सदर कारवाई बी. डी. बागले सहा.दु.नि, व बी. एन. पाटील जवान.ब. न. ०१., एम. डी. पाटील जवान नि-वाहन चालक ब.न.०२ यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड, हे व अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव डॉ.व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. राज्य उत्पादन चाळीसगांव वि, जि. जळगांव असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, चाळीसगाव विभाग के. एन. गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा