बायको अन् मुलांना काढल घराबाहेर,मैत्रिणीला घरी बोलावून रोमान्स सुरू; अचानक बायको आली घरी मग पुढे काय झालं ते एकदा वाचाच.

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- वाळूज महानगरमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. एका नवऱ्याने आपली बायको आणि मुलांना चार महिन्यांपूर्वी घराबाहेर हाकलले. त्यानंतर त्याचा मैत्रिणीसोबत रोमान्स सुरु होता. या नवऱ्याला आणि त्याच्या मैत्रिणीला बायकोने चांगलाच धडा शिकवला आहे.नवऱ्याच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या पत्नीने भावाच्या मदतीने पती तसेच त्याच्या मैत्रिणीला चांगलाच चोप दिला. इतकंच नाही तर नवऱ्याच्या मैत्रिणीला तिने घराच्या गेटला बांधून ठेवलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्या महिलेची सुटका केली आहे.

संजय सपकाळ (50, नाव बदलले आहे) हा त्याची बायको रेखा (नाव बदलले आहे) तसेच दोन मुलांसोबत वडगाव परिसरात राहायचा. तो एका कंपनीत सुपरवायझर पदावर काम करत होता. संजयची काही दिवसांपूर्वी अनामिकासोबत (नाव बदलले आहे) मैत्री झाली. त्यानंतर नवरा -बायकोमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. पुढे मग वाद वाढल्यावर संजयने त्याची बायको आणि दोन मुलांना घराबाहेर काढलं. तीन महिन्यांपूर्वी त्याने बायको आणि मुलांना घरातून हाकलून दिलं. त्यानंतर तो एकटा राहत होता. त्याचा एक मुलगा पुण्याला आणि दुसरा मुलगा हैदराबादला गेला. त्यानंतर रेखा माहेरी निघून गेली.

त्यानंतर संजयने आपल्या मैत्रिणीला घरी आणले.रेखा रांजणगावात आपल्या भावाकडे गेली. बुधवारी रेखा भावाला सोबत घेऊन सकाळी आपल्या घरी गेली. त्यावेळी तिला समोर जे दिसलं त्यामुळे ती खूप संतापली. रेखाला तिचा पती त्याच्या मैत्रिणीसोबत रोमान्स करत असल्याचं दिसलं. रेखा व तिच्या भावाने मिळून अनामिका आणि संजय यांना चांगलाच चोप दिला. इतकंच नाही तर रेखाने अनामिकाचे हात-पाय बांधून घरासमोरच्या गेटला बांधून ठेवलं होतं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर संजयच्या घरासमोर बघ्यांची गर्दी जमा झाली. काही वेळाने पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रेखा चांदे, राजेंद्र उदे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज साळवे, सुहास मुंडे इत्यादींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गेटला बांधून ठेवलेल्या अनामिकाची सुटका केली. तसेच तिला आणि संजयला पोलीस ठाण्यात नेलं. यावेळी संजयने आजारी असल्यामुळे आपण मैत्रिणीला घरी बोलावल्याचे सांगितले. या प्रकरणाची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील इतर काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार