एन.ई.एस.हायस्कुल येथील काँक्रीटीकरण कामाचा आ.चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन संपन्न…

Spread the love

पारोळा :- शहरातील शिक्षण क्षेत्रात नागरिक शिक्षण मंडळ संचलित, एन.ई.एस.हायस्कुल हे नामवंत विद्यालय आहे. या ठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्या मोठी असुन हे विद्यालय शहरातुन जाणाऱ्या जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ लगत आहे. येथे दैनंदिन महामार्गावरून रहदारी करणाऱ्यांसह येथे या विद्यालयात येणारे शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांसह लगतच असलेल्या बाजारपेठेमुळे येथे दैनंदिन वर्दळ असतेच. अशात या विद्यालयात प्रवेश करणारा मुख्य रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली होती.

येथुन पावसाळ्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांसह सर्वांचीच रस्त्याअभावी फजिती होतांना दिसत होती. या रस्त्याचा सुधारणेचा मंडळ विश्वस्तांनी आमदार चिमणरावजी पाटील यांचेकडे मागणी केली होती. याची आमदार चिमणराव पाटील यांनी तातडीने दखल घेत आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. आज आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व ना.शि.मंडळाचे चेअरमन मिलिंदभाऊ मिसर यांच्या अध्यक्षतेखाली भुमीपुजन सोहळा व त्याअनुषंगाने आयोजित श्रीमती लिलाबाई खंडेराव वैद्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

प्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, मंडळांचे उपाध्यक्ष केशवआण्णा क्षत्रिय, सचिव ॲड.अभिमन बागुल, संचालक नितीन भोपळे, मा.नगराध्यक्ष अशोकदादा वाणी, शेतकी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, देवगांव सरपंच समिरदादा पाटील, योगेश पाटील, कैलास पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार