देहरादून : सासूच्या त्रासाला कंटाळून सुनेने असा डाव रचला की पोलीसही हैराण झाले. सुनेनं सासूचा खून केला. तपासानंतर पोलिसांनी आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. देहरादून जिल्ह्यातील डोईवाल ब्लॉकमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सुपारी देऊन सासूचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपी सुनेसह चार आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासूच्या छळाला कंटाळून सुनेने पतीच्या मेकॅनिक वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यासोबत मिळून एक लाख रुपयांची सुपारी देऊन सासूला ठार मारण्याचा सौदा केला होता.
या कर्मचाऱ्याने प्रत्येकी 10 हजार रुपये देऊन आपल्याच गावातील दोन तरुणांना कामावर ठेवलं आणि सासूचा उशीने तोंड दाबून खून केला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. बुधवार रोजी रेशम माजरी, ललताप्पड येथील ५४ वर्षीय महिला कुलदीप कौर यांचा मुलगा जगदेव सिंह याने फिर्याद दिली. त्याची आई 55 वर्षीय कुलदीप कौर हिची घराच्या अंगणात हत्या करण्यात आल्याचं त्याने सांगितलं. त्याने त्याच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या आवेश अन्सारी आणि दोन अज्ञात आरोपींवर खुनाचा आरोप केला.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपी आवेश अन्सारीला अटक करण्याचा तसेच अन्य आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते.आवेश अन्सारी उर्फ छोटू याच्यासह गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची सोनू आणि राहुल अशी नावे आहेत. तपासादरम्यान, आरोपी हरिद्वारच्या लक्सर येथील बसेरी गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. गुरुवारी पोलिसांनी छापा टाकून तिन्ही आरोपींना बसेरी येथील बसस्थानकातून अटक केली.
चौकशीत आरोपी आवेश अन्सारीने सांगितलं की, तो जगदेव यांच्या वर्कशॉपमध्ये सुमारे सात महिन्यांपासून मेकॅनिक म्हणून काम करत होता. कुलदीप कौर ज्योतीला त्रास देत असे. हताश झालेल्या ज्योतीने सासूच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी देण्याचा निर्णय घेतला.हत्येसाठी त्याने एकाच गावातील सोनू आणि राहुलला प्रत्येकी 10 हजार रुपयांना कामावर ठेवलं. कोतवाल विनोद गुसैन यांनी सांगितलं की, 24 वर्षीय सून ज्योतीला तिच्या घरातून अटक करण्यात आली.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४