बांग्लादेशात हिंदू धर्मातील नागरिकांवर अन्याय अत्याचार व हिंसाचाराच्या निषेधार्थ 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी एरंडोल शहर बंद

Spread the love

व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन.

एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल :- गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार उफळुन आला आहे. धार्मिकतेच्या आधारावर बांगलादेशी हिंदूंना टारगेट करून अतोनात असे अत्याचार सुरू आहेत. तेथील मंदिरांची तोडफोड करून हिंदू देवी देवतांची विटंबना तसेच पुजाऱ्यांची निघृण हत्या महिलांवर अत्याचार, बलात्कार केले जात आहेत. व दिवसाढवळ्या महिलांच्या शरीराचे लचके तोडले जात आहेत.

बांगलादेशात होत असलेल्या या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकल हिंदू समाज तर्फे जळगाव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने एरंडोल शहरातील हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी एरंडोल शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. एरंडोल शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार