Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यात बऱ्याचदा काही गाणी तुफान व्हायरल होतात आणि सोशल मीडियावर ट्रेंड बनतात. गाणं हा एक असा प्रकार आहे, ज्यात फक्त शब्दच नाही तर भावनाही जोडल्या जातात.अनेकदा आपल्याला गाण्याचे शब्द किंवा भाषा जरी माहित नसली तरी त्याच्या बिटवरूनच आपल्याला त्यावर नाचण्याची आणि ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहण्याची इच्छा होऊ लागते. काही महिन्यांपूर्वी असेच एक गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. मुख्य म्हणजे हे गाणे आपल्या मराठी भाषेचं जे देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध झाले.
या मराठमोळ्या गाण्याचे नाव आहे गुलाबी साडी. असं क्वचितच कोणी तरी असावं ज्याने हे गाणे ऐकले नसावे. हे गाणे व्हायरल होताच अनेकांनी या गाण्यावर रील बनवून पोस्ट केल्या आणि या रीलदेखील त्यावेळी फार चालल्या. त्यातच आता हे गाणे पुन्हा वर डोके घेऊ इच्छित असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मेडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात काही परदेशी लोक जिममध्ये गुलाबी साडी गाण्यावर थिरकताना दिसले. त्यांच्यातील एनर्जी आणि उत्साह पाहून आता अनेकजण सुखावले आहेत. दर्जेदार नृत्य आणि ट्रेंडी गाणं यांचा एक उत्तम मेळ साधून आल्याचे या व्हिडिओततून दिसत आहे. आपल्या भाषेचे गाणे साता समुद्रापार पसरल्याने अनेकांना याचा सार्थ अभिमान वाटत आहे. अनेक भारतीयांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान हा व्हिडिओ @julius_burphy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा रुटीन फार कठीण आहे पण कोणीही हार मानली नाही. हे गाणं फार आवडलं. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अनेक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या गाण्याचा निर्माता संजू राठोड यानेही या व्हिडिओवर कमेंट करत खूप छान असे लिहिले आहे. एखाद्या गाण्याची क्रेझ किती लांबपर्यंत जाऊ शकते आणि गाण्यातील शब्द नाही तर भावना महत्त्वाच्या असतात हे परतवून देण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे हे व्हायरल गाणं आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.