झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल: शहरात सालाबादाप्रमाणे जय श्रीराम प्रतिष्ठान आयोजित हनुमान कथेचे आयोजन श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरात आहे.
आज दिनांक ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
सदर रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त संकलन केंद्र जळगाव येथील डॉ. आकाश चौधरी वैद्यकीय अधिकारी, लक्ष्मीकांत त्रिपाठी टेक्निशियन सुपरवायझर, राजेश शिरसाठ रक्त केंद्र सायंटिफिक ऑपरेटर, श्री चेतन पवार, तंत्रज्ञ, प्रभाकर पाटील सहाय्यक, सुभाष सोनवणे यांच्या पथकाने रक्त संकलनाचे सहकार्य केले. सदर रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरास चा शुभारंभ भागवताचार्य राजीव कृष्ण जी महाराज,यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद पाटील, डॉ. राजेश महाजन,अमर महाजन, प्रदीप फराटे, सदानंद पाटील, अवि जाधव,ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुमेध महाजन ,राकेश झा, मनोज झा, दिनेश पाटील, ऋषिकेश महाजन,अमित पाटील, सनी पाटील, अनंत पाटील, अजय महाजन,कृष्णा पाटील, ओम पाटील, देव जाधव, धीरज पाटील, मनोज महाजन, निखिल पाटील,टोनी शिरवानी, बंटी शिरवानी, अश्विन पाटील, पुष्पक पाटील संजय महाजन, प्रमोद चौधरी,यांच्यासह सर्व जय श्रीराम प्रतिष्ठान कार्यकारिणीने परिश्रम घेतले.
दरम्यान दि. ६ एप्रिल रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी, पोटाचे विकार, नाक कान घसा, या विषयावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे जय श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.