मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात मारून, छेड काढून लज्जास्पद कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी दिला पाहुणचार; पायावरही उभं राहणंही झालं अवघड.

Spread the love

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश):- पोलिसांनी शुक्रवार,रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या सलमानला अटक केली. मुलींची छेड काढण्यात आरोपी कुप्रसिद्ध आहे.सलमानच्या अटकेचा आणि विनयभंगाच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाईकवरून निघालेला सलमान एका सुनसान जागी एकटी जात असलेल्या मुलीची छेड काढताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.ही घटना मुझफ्फरनगरमधील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरात घडली.

अटकेनंतर, पोलिस कोठडीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान आपल्या पायावर उभा राहू शकत नाही आणि पोलिसांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ गुरुवार रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये हिरो होंडाच्या स्प्लेंडर दुचाकीवर स्वार असलेल्या एका व्यक्तीने जाट कॉलनीत एकट्या जाणाऱ्या नितंबाला मारून पळ काढताना दिसला.१६ वर्षीय पीडित तरुणी मुझफ्फरनगरमध्येच ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण घेत आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर त्यांची मुलगी खूप घाबरली आहे. पोलिसांनी व्हिडिओ तपासला असता आरोपी सलमान असल्याचे निष्पन्न झाले. सलमानच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती. शुक्रवार रोजी तो रुरकी टोल गेटवर उभा राहून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. येथून त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.सलमान हा मुझफ्फरनगर शहरातील खालापारचा रहिवासी आहे.

तो बऱ्याच दिवसांपासून शहरातील मुलींची छेड काढत असे. मुलींच्या नितंबाला मारल्यानंतर पळून जात असे, तर अनेक वेळा तो त्याचे प्रायव्हेट पार्ट्स उघडून सार्वजनिक ठिकाणी दाखवत असे. असे लज्जास्पद कृत्य करताना तो त्याच्या दुचाकीच्या पुढील व मागील नंबर प्लेटला टेप चिकटवत असे.सोशल मीडियावर असा दावाही केला जात आहे की, सलमान मुलींना घाबरवण्यासाठी ॲसिडची बाटली सोबत ठेवायचा. अटकेनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेला सलमानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाईकवरून भरधाव वेगाने निघालेला सलमान दोन पोलिसांच्या खांद्यावर लटकलेला दिसत आहे.भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३५४ (A) व्यतिरिक्त, POCSO कायद्याच्या कलम ७/८ अंतर्गत देखील सलमानवर कारवाई करण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या अतिरिक्त एसपींनी सलमानच्या अटकेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी व इतर आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार