गोंदिया:- पतीने नवऱ्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मेघशाम भावे असे आहे. तर आरोपी महिलेचं नाव वैशाली मेघशाम भावे असे आहे. रात्री झोपेत असतानाच पत्नीने नवऱ्याचा जीव घेतला. कुटुंबियांनी आकस्मित मृत्यू म्हणून अंत्यविधीची सर्व तयारी केली. पण मृतदेहाला आंघोळ गालाताना गळ्यावर व्रण दिसले. त्यानंतर घातपात झाल्याचा संशय मनात आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सत्य बाहेर आले.
घटना काय आहे?
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईसापुर येथील रहिवासी असलेले मेघशाम भावे (42) यांचा खून झाला. पत्नी वैशाली मेघशाम भावे (38) हिने पती मेघशाम भावे यांची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मंगळवारच्या रात्री जेवन करुन भावे कुटुंबीय झोपी गेले होते. पती झोपेत असताना पत्नी वैशाली हिने मेघशाम भावेचा गळा आवळून खून केला. सकाळ होऊन सुद्धा मुलगा जागा झाला नसल्याने वडील कुंडलीक भावे यांनी मेघशामला हाक दिली, पण मुलाने प्रतिसाद न दिल्यामुळे वडिलांनी मुलाच्या पायाला स्पर्श करुन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा मेघशामचं शरीर त्यांच्या हाताला थंड लागल्याने मुलगा मरण पावल्याचे निदर्शनास आले.
मृतदेहाला आंघोळ घालताना व्रण दिसले अन्..
मुलगा मेघशाम याचा आकस्मिक मृत्यु झाला समजून अंत्यविधीची सर्व तयारी पूर्ण कऱण्यात आली. संपूर्ण नातेवाईक आल्यानंतर दुपारी 1 वाजता अंत्यविधी साठी रितीरिवाजाप्रमाणे मेघशामच्या मृतदेहाला आंघोळ घालण्यात आली. पण त्यावेळी त्याच्या गळ्यावरती गळफास सारखे काळ्या रंगाचे निशाण दिसून आले. ही बाब आई-वडिल आणि नातेवाईकांच्या लक्षात येताच मेघशामचा आकस्मिक मृत्यु नसून हत्या करण्यात आल्याचा संशय आला. या बाबतची माहिती कुटुंबियांनी अर्जुनी मोरगाव पोलीसांना दिली.
अर्जुनी मोरगाव पोलीसांनी कसलाही विलंब न करता तात्काळ ईसापुर येथे जात मेघशाम भावेंचे घर गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. संशयावरुन पत्नी वैशाली हिला ताब्यात घेवून कसून चौकशी केली. चौकशीमध्ये पत्नीने मेधशामचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. तर हत्येमागचं नेमक कारण काय ? याचा तपास मोरगांव अर्जूनी पोलिस घेत आहेत. मोरगांव अर्जुनी पोलिसांनी पत्नीच्या विरोधात भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे पण वाचा
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.