अहमदनगर :- जिल्ह्यात हनीट्रॅप सारखे अनेक प्रकार घडले आहेत. नगर शहरासह ग्रामीण भागात देखील या हनीट्रॅपणे अनेकांना गंडवले आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातून ‘पूजा’चे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे.प्रतिष्ठित असणाऱ्या लोकांना रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर हाय असा मॅसेज येतो. इकडच्या तिकडच्या गप्पा होतात व मग सुरु होतो ऑनलाइन रोमान्सचा खेळ. त्यानंतर होते फक्त लूटमार..
अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातील प्रतिष्ठित शेतकरी, नोकरदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींना पूजाच्या करामतीचा फटका बसला आहे.परंतु इज्जत प्यारी असल्याने अनेकांनी या प्रकरणाला वाचा फोडलीच नाही. पोलिसात तक्रार तरी कशी करावी असा प्रश्न बहुतेक या फसवणूक झालेल्यांना पडला असावा. दरम्यान एकाला पन्नास हजारांचा फटका बसला आणि प्रकरण पुढे आले. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने याची खात्री करत वाचा फोडली.
अकोले संगमनेर तालुक्यातील अनेक लोक ‘पूजा शर्मा’ या नावाने फेसबुकवर असलेल्या अकाऊंटवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात.एकजण जोडला गेला की, त्याचे फेसबुक फ्रेंड आपोआप संपर्कात येतात. त्यांचे वय, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठचा अंदाज येतो. अशा व्यक्तींना जाळ्यात ओढले जाते आणि शेवटी लूट केली जाते असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.यातील वृत्तानुसार, पुरुषांच्या व्हॉट्सअॅपवर ‘हाय’चा मेसेज येतो. डीपीला एका महिलेचा फोटो असतो. इकडून हाय केले की कैसे हो डिअर’ आणि मग नाव, इकडच्या तिकडच्या गप्पा, ऑनलाईन येण्याची मागणी केली जाते.दरम्यान काही दिवस गेले की मग पुरुषांकडे नको ती मागणी केली जाते. रेकॉर्डिंग केले जाते व ते व्हायरल करण्याची धमकी देत लूटमार केली जाते.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन