Viral Video : मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पर्यटक या वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जात आहेत. परंतु, शहरी भागात राहणारी माणसं पावसाळ्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्येच धबधब्याचा आनंद घेतात असं म्हणायला काही हरकत नाही.पावसाळा सुरू झाला की जागोजागी पाणी साचलेलं दिसतं, म्हणून नागरिकांनी गरजेनुसारच घराबाहेर पडा, वाहने सावकाश चालवा, असे आदेश नेहमीच ऐकायला मिळतात; तरीही या आदेशाचं पालन अनेकदा न होतानाच आपल्याला दिसतं.
तसेच सोशल मीडियाच्या युगात इन्फ्लुएन्सर पावसाळ्यातदेखील सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडीओशूट करून काही नियमांचं उल्लंघन करतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जिथे एक तरुणी रस्त्यावर पावसाचा आनंद घेत असताना अचानक मागून एक दुचाकीस्वार येतो आणि तिला भिजवून जातो. आता यात चूक नक्की कोणाची ते तुम्हीच सांगा.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला रस्त्यावर पावसाच्या साचलेल्या पाण्यात डान्स करत असते आणि व्हिडीओ शूट करत असते. तितक्यात मागून अगदी जोरदार स्पीडने एक बाईक येते आणि तरुणीला भिजवून जाते. बाईक चालवणारी व्यक्ती त्या तरुणीला साचलेल्या पावसाच्या पाण्याने संपूर्णपणे भिजवून टाकते.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)
marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओवर युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘भाऊ बहुतेक सरळ जाणार होता, पण त्या मुलीला पाहून त्याने रस्ता बदलला’; तर एक जण म्हणाला, ‘त्या मुलाला पाणी उडवा, मुलीला भिजवा पुरस्कार मिळाला पाहिजे’, अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र, काहींना त्या बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचं वागणं पटलं नाही आणि अशा वागण्याला नेटकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘यात कूल बनण्यासारखं काही नाही आहे, ती फक्त तिचा डान्स करत होती.’ तर दुसऱ्याने लिहिलं, काही लोकांना दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही आणि नंतर ती लोक मुलींनाच नावं ठेवतात.’ तर एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘त्याने मुद्दाम तरुणीला भिजवलं.’
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन