जळगाव :- जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून चोरीस गेलेल्या दुचाकी आणि ऑटो रिक्षा शोधण्यास पोलिसांना मोठे यश आले आहे. चोरीच्या वाहनांचा व्यवहार करणाऱ्या इसमाकडून पोलिसांनी १४ दुचाकी आणि ०६ ऑटो रिक्षा स्वरुपात 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चोरीला गेलेली मोटरसायकल धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एक इसम वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोपीला व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांनी जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून सोडलेल्या व विकलेल्या 14 मोटरसायकल व सहा ऑटो रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस स्टेशन नोंद असलेल्या गुन्ह्यातील मोटरसायकल धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आरोपी चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भरारी पथक तयार केले. तसेच या पथकाच्या आधारे पाळधी गावातील शनिनगर स्टेशन रोड भागात संशयित आरोपी मुस्तकीन अजीज पटेल (वय.२८ रा शनिनगर देढ गल्ली पाळधी) याची कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता, त्याने आणि त्याचे दोन साथीदारांनी मिळून दोन वर्षापुर्वी जळगांव शहरातुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले.
यावरुन त्याचे साथीदार आमीन कालु मनियार (वय.३९ रा रंगारी मोहल्ला पाळधी) जाबीर सलामत शेख (वय.२७ रा इदगांह प्लाट पाळधी) यांनाही पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगांव, मालेगांव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जुहू मंबई बारडोली (गुजरात) या तसेच इतर शहरातुन महागड्या मोटार सायकल व ऑटो रिक्षा चोरी करुन वेगवेळ्या इसमाना विक्री केल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहीतीवरुन पोलीस पथकाने एकुण १४ महागड्या मोटार सायकल व ६ ऑटो रिक्षा एकूण किमंत २२ लाख ४० हजार रुपयाचे जप्त केल्या. तपासाच्या अनुषंगाने जळगांव शहर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात रोजी देण्यात आले आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन