भागलपूर :- शहरातील पोलीस वसाहतीत एका युवकाने त्याच्या पोलीस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केली. त्यासोबतच २ मुले आणि सासूचा गळा दाबला आणि स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. प्रेमविवाहानंतर एकमेकांसोबत सात जन्म राहण्याची शपथ घेणाऱ्या या जोडप्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सगळेच हैराण आहेत.
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये नोकरी करताना झाली होती. पुढे जाऊन या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यात नीतूने बिहार पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी केली. २०१५ ला तिला यश मिळालं. कॉन्स्टेबल बनल्यानंतर २०१९ मध्ये नीतूने जानेवारीत पंकजसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना २ मुले झाली. सुरुवातीला नीतूची पोस्टिंग नवगछिया इथं होती. त्यानंतर भागलपूर एसएसपी कार्यालयात बदली झाली. सरकारी नोकरीमुळे कॉन्स्टेंबल नीतू कुटुंबासह पोलीस वसाहतीत राहायला आली.
जिथं पंकज, २ मुले, नीतू आणि त्याची सासू हसतखेळत राहत होते. नीतूचा नवरा पंकज एका बुटाच्या दुकानात काम करत होता. त्यातच पंकज आणि नीतू यांच्या संसाराला संशयाचं ग्रहण लागलं. अनैतिक संबंधांवरून पंकज आणि नीतू यांच्यात भांडण होऊ लागली. नीतूचे अन्य पुरुषाशी संबंध आहेत असं पंकजला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद सुरू झाले. मंगळवारी पहाटे एका दूधवाल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहिले आणि त्याने तातडीने शेजाऱ्यांना कळवलं. पोलिसांनी टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी काही मृतदेह बेडवर तर काही जमिनीवर पडल्याचे पाहिले.
पंकजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सोमवारी रात्री नीतू आणि पंकजमध्ये घराबाहेर काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून पंकजनं आत्महत्येपूर्वी पत्नी, २ मुले आणि सासूचा खून केल्याचं कबुल केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन