सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नाद तरुणीस चांगलंच महागात पडलं, एक व्हिडिओ कॉल आला अन्…..

Spread the love

राजगड (छत्तीसगड):- आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. पूर्वी लोकांना शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असत. ऑफिसमधले सहकारीही मित्रच असत. आता मात्र व्हर्च्युअल फ्रेंड्स जास्त असतात. हे मित्र खऱ्या आयुष्यात सहसा भेटत नाहीत मात्र फक्त सोशल मीडियावर त्यांची मैत्री असते. सोशल मीडियावर काय पोस्ट केलं आहे यावरुन त्यांना तुमची माहिती मिळत असते. इन्स्टाग्रामवर भरपूर फॉलोअर्स असावेत म्हणून अशा लोकांना ॲड केलं जातं. मात्र, अनोळखी व्यक्तीला ॲड करणं छत्तीसगडमधील एका मुलीला चांगलंच महागात पडलं आहे.

छत्तीसगडमधील राजगड घरघोडा पोलीस स्टेशनला एका तरुणीने दीपेश शर्मा नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. दीपेशने आधी इन्स्टाग्रामवर तिला फॉलो रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर मार्चमध्ये तिला व्हिडिओ कॉल केला. हा व्हिडिओ कॉल दोन सेकंद चालला. या दोन सेकंदांच्या कॉलवरुन दीपेशने तिचा व्हिडिओ बनवला आणि त्याचा गैरवापर करुन फेक व्हिडिओ केला. नंतर त्या व्हिडिओची भीती दाखवून तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तरुणीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.दीपेशची इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट आल्यानंतर तिने ती ॲक्सेप्ट केली.

याचे परिणाम काय होतील याचा विचारही तिच्या मनात आला नाही. नंतर मार्च महिन्यात त्याने तिला व्हिडिओ कॉल केला. दोन सेकंद चाललेला हा कॉल त्याने रेकॉर्ड केला. तिच्या चेहऱ्याचा वापर करुन त्याने एक फेक व्हिडिओ तयार केला आणि त्याची भीती घालून तो तिच्याकडे पैसे मागू लागला.तरुणीने होणाऱ्या नवऱ्याकडून घेऊन त्याला एक हजार रुपये दिले. मात्र, दीपेशने पुन्हा पैसे मागताच ती थेट पोलिसांकडे गेली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी दीपेशला अटक केली. दीपेशने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दीपेशने फेक व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करायला सुरुवात करताच तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला याबाबत माहिती दिली. दोघांनी मिळून कुटुंबाशी सल्लामसलत केली आणि पोलीस कंप्लेंट करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत तातडीने तपास केला आणि आरोपीला अटक केली.

हे पण वाचा

टीम झुंजार