गोपालगंज :- प्रेमात माणूस इतका आंधळा होता, की तो सगळ्या मर्यादाही ओलांडतो, असं म्हणतात. दोन व्यक्ती प्रेमात पडतात तेव्हा ते जात, धर्म सर्व काही विसरतात. काही वर्षांपूर्वी लोकांना आंतरजातीय विवाहाची भीती वाटत होती.समाजाच्या भीतीने अनेक प्रेमकथा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पण आता अगदी समलैंगिक विवाहही होत आहेत. मुली मुलींच्या प्रेमात पडतात. पुरुष पुरुषांशी लग्न करतात. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात गोपालगंजमधील एका मामीने आपल्याच भाचीशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.
कुचायकोटच्या बेलवा गावातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिथल्या एका मंदिरात तो शूट केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला लग्न करताना दिसत आहेत. पण जर आम्ही तुम्हाला त्यांच्यातील नातं सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरं तर या दोघी महिला मामी आणि भाची आहेत. होय, मामी आणि भाची प्रेमात पडल्या आणि तीन वर्षांच्या रोमान्सनंतर अखेर त्यांचं लग्न झालं. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.मंदिरात लग्न झाल्यानंतर मामी आणि भाचीने त्यांच्या नात्याचा खुलासा केला.
लग्नानंतर दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हे नातं तीन वर्षांपूर्वी बेलवा गावातील शोभा कुमारी यांनी त्यांची भाची सुमन हिला पाहिलं तेव्हापासून सुरू झालं. दोघीही पहिल्याच नजरेत प्रेमात पडल्या. यानंतर भाची रोज मामाच्या घरी जात असे. सुमनच्या लग्नानंतरही तिचं मामीच्या घरी येणं कमी झालं नाही. पण या नात्यावर कोणालाच शंका आली नाही. हे प्रेमप्रकरण तीन वर्षे चाललं आणि आता त्यांनी लग्न केलं.12 ऑगस्ट रोजी दुर्गा मंदिरात दोघांचा विवाह झाला. यावेळी मंदिरात अनेकांची गर्दी झाली होती.
लग्नानंतर दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी सांगितलं की, आता त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही. त्या आयुष्यभर एकत्र राहणार आहेत. भाचीने सांगितलं, की ती मावशीला कधीही सोडणार नाही. त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही. या प्रकरणावर सध्या त्यांच्या दोन्ही पतींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.