करणी सेना जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्षपदी अमरजितसिंग राजपूत, एरंडोल तालुकाध्यक्षपदी अँड प्रेमराज राजपूत, शहराध्यक्षपदी मोहित परदेशी यांची नियुक्ती

Spread the love

एरंडोल :- संभाजीनगर येथे नुकतीच करणी सेना प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये करणी सेना जळगाव ( पश्चिम ) जिल्हाध्यक्ष म्हणून एरंडोल येथील श्री. अमरजितसिंग राजपूत, करणी सेना एरंडोल तालुकाध्यक्ष म्हणून अॅड. प्रेमराज राजपूत व करणी सेना एरंडोल शहर अध्यक्ष म्हणून श्री. मोहित परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली.

करणी सेनेच्या प्रदेश पदधिकारी आढाव बैठक प्रंसगी किसान शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधूकर अप्पा डोमसे, करणी सेनेचे प्रदेशअध्यक्ष देविचंदसिंह बारवाल, करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या राजपुत, उत्तर महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री. जयदीपसिंह राजपूत, हायकोर्टचे वकील अॅड. आनंदसिंह बायस तसेच इतर मान्यवर व वरिष्ठ प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

करणी सेना ही भारतातील सर्वात मोठी संघटना असून या संघटनेचे संघटन देश-विदेशांमध्ये पसरलेले आहे करणी सेना फक्त राजपूतांसाठीच नव्हे तर सर्व समाजासाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. खूप कमी कालावधीमध्ये करणी सेना या संघटनेला लोकांची पसंती व नावलौकिक मिळाले. करणी सेनेकडे खास करून युवा तरुण वर्गाचे आकर्षण आहे.

याप्रसंगी लवकरच जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणी तयार करून करणी सेनेचे संघटन वाढविण्यात येईल असे करणी सेना जळगाव ( पश्चिम ) जिल्हाध्यक्ष श्री. अमरजितसिंग राजपूत यांनी सांगितले.

हे पण वाचा


टीम झुंजार