जयसिंगपूर :- पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जयसिंगपुरातील नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवारहल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. या हल्ल्यात सुनील रामाप्पा लमाणी (वय 28, रा.नांदणी नाका, लमाणी वसाहत धरणगुत्ती, ता. शिरोळ) हा जखमी झाला आहे. आईच्या सतर्कतेमुळे मुलाचा प्राण वाचला आहे.याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार (दोघे रा. कालीबागतांडा, एलटी विजयपूर), विनोद बाबू जाधव (रा. नांदणी नाका, लमाण वसाहत, धरणगुत्ती) या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असले तरी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुनील लमाणी याचे वडील लघुशंकेकरिता गेले होते. सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. यावेळी तिघे संशयित मोटारसायकलवरून आल्यानंतर त्यातील विनोद पवार याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने सुनीलवर तलवारीने वार केला. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. त्यानंतर प्रतिकार करत सुनील व त्याच्या आईने संशयितांवर दगडफेक केल्यानंतर ते पसार झाले.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.