नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह वायुदलाच्या विशेष विमानाने जळगाव येथे आणून नातेवाईकांना केलेत सुपूर्द

Spread the love

जळगाव :- नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश ( राजूमामा ) भोळे आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी, उपस्थित होते.

दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तींची नावे, आणि त्यांची गावे

१) प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल. २) रोहिणी सुधाकर जावळे, वरणगाव.३) पल्लवी संदिप सरोदे, वरणगाव, ४) अनिता अविनाश पाटील दर्यापूर.५) सरोज मनोज भिरुड, जळगाव/तळवेल, ६) सुलभा पाडुरंग भारंबे, भुसावळ.७) गणेश पाडुरंग भारंबे, भुसावळ. ८) मिनल गणेश भांरबे, भुसावळ.९) परी गणेश भारंबे, भुसावळ.१०) विजया कडू जावळे, वरणगाव.११) निलिमा चंद्रकांत जावळे, वरणगाव.१२) संदिप राजाराम सरोदे, १३)वरणगाव. तुळशिराम बुधा तायडे, तळवेल. १४) सुहास प्रभाकर राणे, तळवेल.१५) निलिमा सुनिल धांडे, भुसावळ.१६) भारती प्रकाश जावळे, वरणगाव, १७) सागर तडु जावळे, वरणगाव.१८) आशा समाधान बाविस्कर, तळवेल.१९) सरला तुळशिराम तायडे, तळवेल. २०) अनुप हेमराज सरोदे, २१)सरला सुहास राणे, तळवेल. २२) पंकज भागवत भंगाळे, वरणगाव. २३) मंगला विलास राणे, तळवेल.२४) रिंकु चंदना सुहास राणे, तळवेल. २५) सुधाकर बळीराम जावळे, वरणगाव.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील २५ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने आज शनिवार रोजी २५ जणांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यात आले आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात आले आहेत.

रक्षा खडसे जखमींच्या भेटीसाठी काठमांडू येथील रुग्णालयात

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नेपाळ दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात भेट दिली.नेपाळला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील 27 जणांचा बस अपघातात मृत्यू झाला आहे.तर 16 जण जखमी झाले आहेत.

रक्षा खडसे यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा

या मृतदेहांपैकी अनेकांची ओळख पटू शकलेली नाही. नातेवाईकांच्यामध्ये आपल्या परिजनांनाच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री रक्षा खडसे, आ संजय सावकारे आणि अमोल जावळे हे नेपाळकडे रवाना होऊन काठमांडू येथे दाखल झाले आहेत. भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे. घटनास्थळावरून तातडीने बचावकार्य पाहणी करण्यासोबत ते मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

वेगवेगळे निरोप येत असल्याने सायंकाळी अवघे गावच सुन्न झाले,एकाही घरात चूल पेटली नाही

या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबातील चार- चार जणांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी वरणगाव येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आली. अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही. त्यात सायंकाळी गावातील एका मुलीसह दहा भाविकांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण गाव सुन्न झाले. सायंकाळी एकाही घरात चूल पेटली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी वरणगावात भेट दिली.

‘त्यांचे’ दैव बलवत्तर होते म्हणून ते वाचले

पुणे : ‘यात्रेकरुसोबत तीन दिवसांपूर्वी माझे आई- वडील होते. त्यांचा आजार वाढल्याने ते परतले अन्यथा आज माझे आई-वडील घरी आले नसते. हा विचार करूनच छातीत धस्स झाले. पण, आज माझ्याच ओळखीतील अनेक लोकांचा मृत्यू झाला, याचंदेखील दु:ख आहे,’ अशी भावना पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केली.

हे पण वाचा

टीम झुंजार