Viral Video: भारतीय चित्रपटांतील नवी गाणी असो किंवा जुनी गाणी असोत, या गाण्यांची भुरळ परदेशातील लोकांनाही पडते. सोशल मीडियावर ही गाणी सातत्याने चर्चेत असतात. त्या गाण्यांवर अनेक लोक रील्स बनवतानाही दिसतात.परदेशातील कलाकारदेखील भारतातील या विविध भाषेतील चर्चेत असणाऱ्या गाण्यांवर रील्स बनवतात. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणी, तसेच मराठमोळे ‘गुलाबी साडी’ हे गाणं, ‘देखा तेनु’, ‘तौबा तौबा’ अशी अनेक नवीन गाणी चर्चेत आली आहेत,
ज्यावर भारतासह परदेशातीलही लाखो युजर्सनी रील बनवले आहेत. दरम्यान, आता बॉलीवूडमधील एक जुनं पण अनेकांच्या आवडीचं गाणं एक परदेशातील तरुणी गाताना दिसतेय.बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील एकतरी गाणं सुपरहिट होतंच. सध्या सोशल मीडियावर एका परदेशातील तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती ‘मोहब्बतें’ चित्रपटातील ‘आंखें खुली हों’ हे गाणं गाताना दिसतेय.
हा व्हिडीओ चीनमधील असून एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभी राहून शाहरुखच्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातील ‘आंखें खुली हों’ हे गाणं सुंदर आवाजात गात आहे. आजूबाजूला उभे असलेले लोकही तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. युजर्सही सोशल मीडियावर या तरुणीचं खूप कौतुक करत आहेत.हा व्हिडीओ x(ट्विटरवरील) @Dinesh Purohit या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.
तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.युजर्सच्या कमेंट्स चर्चेतएका युजरने लिहिलंय की, ‘खूपच सुंदर’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “क्या बात है”, तर आणखी एकानं लिहिलंय, “सुंदर आवाज आहे हिचा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूपच भारी.’दरम्यान, यापूर्वी देखील अनेक परदेशी कलकारांनी भारतीय गाणी सुंदर स्वरात गायली आहेत. ज्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच अनेक कलाकार भारतीय गाण्यांवर ठेका धरतानाही दिसतात.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.