एरंडोल :- येथील नवीन बसस्थानक व आगाराच्या नूतनीकरणासाठी सुमारे चार कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे प्रवाशांच्या गैरसोयी दूर होणार असून सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.बसस्थानक व आगाराच्या दुरावस्थेमुळे कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. येथील नवीन बसस्थानकावर पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
बसस्थानकाच्या वाहनतळावर सर्वत्र खड्डे पडले असून प्रवाशांना बसमध्ये चढतांना तसेच उतरतांना मोठी कसरत करावी लागते.पावसाळ्यात वाहनतळावर
सर्वत्र चिखल व गारा होत असल्यामुळे बस कोठे लावावी असा प्रश्न चालकांसमोर उभा राहत असतो. बसस्थानकावर प्रवाशांसाठी असलेली आसन व्यवस्था
खराब झाली आहे.बसस्थानकावर असलेल्या स्वच्छतागृहाचे सांडपाणी वाहून जाण्याची सोय नसल्यामुळे सर्व पाणी परिसरातच तुंबत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून याठिकाणी मोकाट कुत्रे व डुकरे यांचा मुक्तपणे संचार दिसून येतो.प्रवाशांसाठी पाणी पुरवठा करणा-या जलकुंभाजवळ सर्वत्र घाण जमा
झाली असून अनेक दिवसांपासून याठिकाणी साफसफाई करण्यात आलेली नाही.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा खड्डा पडला आहे.बसस्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांसमोर उभ्या राहणा-या समस्यांची माहिती स्थानिक पदाधिका-यांनी आमदार चिमणराव पाटील यांना दिली होती.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील बसस्थानक परिसरात पाहणी करून प्रवाशांना होणा-या त्रासाची माहिती जाणून घेतली होती.आमदार चिमणराव
पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून बसस्थानक व बस आगाराच्या नूतनीकरणासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्यामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
बसस्थानकाच्या व आगाराच्या नूतनीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीतून वाहनतळाचे कॉंक्रीटीकरण करण्यात
येणार असून प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध होणार आहेत.तसेच आगाराचे देखील नुतनीकरण होणार असल्यामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळणार
आहे.यापूर्वी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या
बांधकामासाठी,तहसीलदार कार्यालयाच्या बांधकामासाठी देखील निधी मंजूर झाला असून लवकरच कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.
शहरातील राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळा परिसराचे
सौंदर्यीकरण,बसस्थानकाचे नुतनीकरण,तहसीलदार कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालयासाठी सर्व सोयींनीयुक्त नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, नगरपालिकेची नवीन कार्यालयाचे बांधकाम आदी कामांमुळे शहराच्या विकासात भर पडणार असून शहराच्या विकासाची घौडदौड वेगाने कायम सुरु राहील
असा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.