Viral Video : अनेकदा सोशल मिडियावर खूप व्हिडियो व्हायरल होत असतात. काही लोकांना ते आवडतात,तर काहीना नाही. असाच काहीसा प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. जिथे एका यूट्यूबरने अचानक रस्त्याच्या मधोमध पैसे उडवायला सुरुवात केली आहे.त्यानंतर तिकडे गर्दी निर्माण झाली आणि लोकांची पैसे लुटण्यासाठी भांडणे सुरु झाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी खूप संताप व्यक्त केला आहे.
यूट्यूबर (YouTuber)चा सोशल मिडियावर व्हायरल व्हिडीओ आजकालच्या या तरुण पिढीमध्ये सगळ्यांनाच इन्फ्लुएंसर व्हायचं असतं. काही जणं चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन युक्त्या घेऊन येतात. काही डान्स करुन चाहत्यांची मने जिंकतात तर काही गमतीदार व्हिडिओ बनवून लोकाचं लक्ष वेधून घेतात.त्याच वेळी,काही लोक अशा काही गोष्टी करतात की त्यांना तुरुंगातही जावे लागते.तसेच आज एका हैदराबादच्या प्रसिद्ध (famous)यूट्यूबरने केले आहे .
त्याच नाव पॉवर हर्ष उर्फ महादेव , ज्याला “its_me-power”म्हणून ओळखतात, याने कुकटपल्ली परिसरात बाईकवर मागे बसून हवेत नोटा उडवल्या आहेत. रस्त्यावरुन चालणारे पादचारी आणि वाहणधारकांनी पैसे गोळा करण्यासाठी गोंधळ सुरु केला आणि अनेकांना हा गोंधळ पाहून अपघाताची भीतीही वाटली.
कडक कारवाईची मागणी
आता व्हायरल झालेला हा व्हीडिओ पाहून लोक हर्ष वर खूप संतापले आहेत . अशा कृत्यामुळे लोकांच्या मनात नाराजी पाहायला मिळाली आहे. त्यांनी हर्ष वर टीका करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निष्काळजी स्टंटमुळे(Stunt) हैदराबारमधील एका रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
बक्षीस देण्याच वचन
या स्टंटद्वारे हर्षने आपल्या चाहत्यानां त्याच्या टेलिग्राम चॅनलमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्याने लोकांना बक्षीस देण्याचा आश्वासन दिलं आहे. जो कोणी हवेत उडवलेल्या नोटांचा अचूक अंदाज लावेल, त्याला बक्षीस मिळेल , तुम्ही लोक देखील माझ्यासारखे खूप पैसे(money) कमवू शकता .या आरोपी युट्युबवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही .
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.