आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या मंडळींसह पत्नीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल.
नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सासरच्या मंडळींसह पत्नीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुगंधा पवार, हरि काळू देवरे, रत्ना हरी देवरे, संध्या मनोहर मांडवळे व मोना गणेश जेऊघाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांना एक सुसाइड नोटदेखील सापडली आहे. धक्कादायक म्हणजे, पत्नी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझा मानसिक छळ करत असल्यास सुसाईड नोट मध्ये लिहिण्यात आलं आहे. याबाबत प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर,सिडको) यांनी फिर्याद देण्यात आलीये.
पवार कुटुंबिय बाहेरगावी असतांना संशयित सून सुगंधा, तिचे आई- वडिल, बहिण व बहिणीची पुणे येथे राहणारी मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार (४५ रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला, असं तरुणाच्या वडिलांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. पत्नी व तिच्या सासरच्या मंडळीच्या त्रासाला वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
नाशिकमध्ये तीन धक्कादायक घटना
बदलापूर अत्याचाराची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये ३ धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. चांदवडमधील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणीचं अपहरण करण्यात आलं असून या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा प्रकार वडणेर भैरव येथील ७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. तर, तिसरा प्रकार अतिषय संतापजनक आणि किळसवाणा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सिन्नरच्या वावी गावात साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.