Viral Video:- हैदराबादमध्ये भरदिवसा 1.45 च्या सुमारास दोन चोरट्यांनी एका सराफा दुकानात घुसून हा गुन्हा केला आहे. या संपूर्ण घटनेतील दोन्ही दुचाकीस्वार गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. ज्यामध्ये एका व्यक्तीने बुरखा तर दुसऱ्याने हेल्मेट घातले होते. दोघेही दुकानात पोहोचताच त्यांनी सराफा व्यावसायिक आणि त्यांच्या मुलाला धमकावले आणि दुकानदाराच्या खांद्यावर चाकूने वार केले.दुसरा गुन्हेगार दुकानात ठेवलेले पैसे आणि दागिने काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
यावेळी बुरखा घातलेला एक चोरटे दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत आहे. दरम्यान, जखमी दुकानदाराने हिंमत दाखवून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरड केली, त्यानंतर दोघेही चोरटे घटनास्थळावरून पळू लागले. यावेळी दुकानात दुकानदाराच्या मुलानेही खुर्चीने वार केले. मात्र तरीही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.या दरोड्यादरम्यान दुकानदार शेषराम यांचे धाडस आणि त्यांच्या मुलाने केलेल्या आवाजामुळे दरोडा अयशस्वी झाला.
आणि लुटलेले सर्व पैसे आणि दागिने जागेवरच सोडून दोन्ही चोरटे पळून जातात. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यापासून अवघ्या 25 मीटर अंतरावर हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळच उड्डाणपूल बांधण्यात आल्याने परिसरातील सुमारे 25 सीसीटीव्ही कॅमेरे हटवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी हातमोजे घातले होते त्यामुळे घटनास्थळावरून बोटांचे ठसे मिळालेले नाहीत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






