सफाई कर्मचाऱ्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका व चेअरमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
नंदुरबार :- बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. यानंतर शालेय मुली तसेच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्यातच आता नंदुरबारही बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 50 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
ही घटना शाळेने लपवल्याचा आरोप होत आहे.या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शाळा प्रशासनानेही आरोपी कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ केलं आहे. बदलापूरची घटना ताजी असतानाच घडलेल्या या घटनेमुळे नंदुरबारमधील पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता वाढली आहे. आरोपी कंत्राटी पद्धतीने शाळेत कामावर होता. त्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवल्याने खळबळ उडाली आहे.
हा प्रकार शाळेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सफाई कामगाराने शाळा सुटल्यानंतर मुलीला एकांतात भेटायला बोलवलं होतं. मुलगी आल्यानंतर त्याने तिला आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला. या घटनेविषयी पीडितेने आपल्या पालकांना सांगिते. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पीडीतेच्या आईने तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत पन्नास वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेकडून त्या सफाई कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
चेअरमनसह मुख्याध्यापिका यांचेवर गुन्हा दाखल.
अल्पवयीन मुलीची आई व नातेवाईक यांना मुख्याध्यापक व चेअरमन व यांनी सांगितले की तुम्ही पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला तर पेपरला बातमी येईल शाळेचे नाव बदनाम होईल असे पिडीतेच्या आई व नातेवाईकांना सांगितल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व चेअरमन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकार शाळेने लपवल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून शाळेचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. दोषी आढळल्यास शाळेवर देखील होणार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
बदलापूरसारखीच घटना नंदुरबारमध्ये घडली असल्याने आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास देखील सुरक्षित वाटत नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य कारवाई करावी, अशी मागणी येथील पालकांनी केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, अशी माहिती नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.