पुणे: सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही महिला आपल्या जवळच्या नातेवाईकांशी अफेअर करत असल्याचीही काही प्रकरणं घडत आहेत. बिहारमध्ये असंच एक प्रकरण घडलं आहे.बिहारमधल्या बांका इथे राहणारी चार मुलांची आई आपल्या भाच्यासह पळून गेली आहे. मामी आणि भाचा दिल्लीत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघंही पुण्याला पळून गेले. काही काळ तिथे राहून ते बांकाला परतले आणि भाड्याच्या घरात राहत होते.
याची माहिती मिळताच महिलेच्या पतीने गोंधळ घातला आणि पोलिसांना बोलावलं. यानंतर पोलिसांनी मामी, भाचा आणि पीडित पतीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं.बांकामधल्या अमरपूर भागातली हे घटना आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की काही काळापूर्वी तो कामानिमित्त दिल्लीत राहत होता. त्याचा भाचा गावात बेरोजगार भटकत होता. त्यामुळे त्याने भाच्यालाही दिल्लीला बोलावून एका कंपनीत नोकरी मिळवून दिली.
दरम्यान, त्याची पत्नी आणि भाचा प्रेमात पडले. हा प्रकार लक्षात येताच मामाने भाच्याला घरातून हाकलून दिलं; मात्र काही दिवसांनी मामीने आपल्या चार मुलांना घेऊन भाच्यासह तिथून पळ काढला.दोघंही पुण्यात एकत्र राहिले. नुकतेच दोघंही पुण्याहून बांकामध्ये परतले आणि भाड्याच्या घरात राहत होते. याची माहिती मिळताच पीडित पती त्यांच्या घरी गेला. त्यांच्यासोबत पतीची चार मुलंही होती. पतीने गोंधळ घालून पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने चौकशीत सांगितलं की, तिला पतीसोबत राहण्याची इच्छा नाही. तिला भाच्यासोबत रहायचं आहे. तिने आपल्या चार मुलांना पतीकडे सोडण्याची तयारी दाखवली आहे.पीडितेच्या पतीने या प्रकरणी भाचा आणि पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाच्याच्या आई-वडिलांना याची माहिती देण्यात आली आहे. अमरपूर पोलीस स्टेशनचे अध्यक्ष पंकज कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमप्रकरण असून मामी आणि भाचा दोघंही सज्ञान आहेत. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.